Friday , August 21 2026
Breaking News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; अथणीत पती अटकेत

Spread the love

 

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील नंदगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदगाव येथील श्री अवजीकर मठ परिसरात राहणाऱ्या शोभा परगोंडा सारवाड (वय ३५) यांची त्यांच्या पती परगोंडा संगप्पा सारवाड याने हत्या केली. आरोपी गेल्या चार वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. नातेवाईक आणि गावातील ज्येष्ठांनी अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

रविवार, २८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास, शोभा या घरात झोपलेल्या असताना आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्या गळ्यावर व हातावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या शोभा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत महिलेचे बंधू महांतेश गुरप्पा पाटील यांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपी पतीला तातडीने अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास अथणी पोलीस करत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

फाउंड्री क्लस्टरमध्ये गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *