Thursday , August 20 2026
Breaking News

कॅम्प पोलीस ठाण्याचे नव्या इमारतीत स्थलांतर; उद्यापासून बीएसएनएल इमारतीतून सेवा

Spread the love

 

बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हाय स्ट्रीटवरील बी.सी. क्र. ९७ येथील जुन्या इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याने हे पोलीस ठाणे आता ग्लोब चित्रपटगृहासमोरील बीएसएनएल इमारतीत कार्यरत राहणार आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी यापुढे कॅम्प पोलीस ठाण्याशी संबंधित सर्व तक्रारी, अर्ज तसेच इतर पोलीस सेवांसाठी नव्या ठिकाणी संपर्क साधावा. या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *