Friday , October 23 2026
Breaking News

ज्योती कॉलेज मैदानावर ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन’तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न

Spread the love

 

बेळगाव: नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या २० सदस्यांनी ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर ज्योती कॉलेजच्या मैदानाची स्वच्छता केली आणि तेथील कचरा गोळा केला.
सदस्यांनी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेला कचरा गोळा करून महानगरपालिकेच्या वतीने योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एकत्र ढीग करून ठेवला.
या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी केले. त्यांच्यासोबत माजी अध्यक्ष श्री. विकास कलघटगी, श्री. उमेश पाटील आणि उपाध्यक्ष मधू बेळगावकर उपस्थित होते. या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलेले प्रमुख सदस्य, जयवंत पाटील, भाऊ किल्लेकर, दयानंद भेंडीगेरी, प्रकाश तांजी, सुनील मुरकुटे, मुकुंद महागावकर, दिगंबर किल्लेकर, महादेव केसकर, सुनील पवार, ज्ञानेश शिंदे आणि समाजसेवक दुर्गेश मैत्रि आणि पत्रकार अनंत कुचेकर उपस्थित होते
या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून, प्रा. आनंद आपटेकर यांनी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे व इतर सदस्यांचा मैदानाची स्वच्छता पूर्ववत राखल्याबद्दल सत्कार केला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *