Friday , October 23 2026
Breaking News

महिला सक्षमीकरणासाठी सकल मराठा समाजाचा पुढाकार; मनिषा पाटील यांच्या भाकरी केंद्राचे उद्घाटन

Spread the love

 

भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन

बेळगाव : महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या प्रगतीत योगदान द्यावे, या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या वतीने रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. याच उपक्रमांतर्गत मनिषा पाटील यांनी सुरू केलेल्या भाकरी केंद्राचे उद्घाटन भाजप नेते आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळावा आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

मनिषा पाटील यांनी सुरू केलेले भाकरी केंद्र हे महिला स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. महिलांनी विविध व्यवसायांत पुढाकार घ्यावा, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि समाजाने त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘महिला सक्षमीकरण हे समाजाचे बळ असून, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मनिषा पाटील यांच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देत त्यांच्या भाकरी केंद्राची उत्तरोत्तर भरभराट होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या कष्टांना सन्मान मिळवून देणारे असे उपक्रम समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *