Friday , October 23 2026
Breaking News

कडोली साहित्य संमेलन १० जानेवारीला

Spread the love

 

कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे आयोजित ४२ वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १० जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (ता. २०) रात्री साहित्य संघाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते. या बैठकीत ४२ वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १० जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बैठकीत संमेलनाची सत्रे, नियोजित संमेलनाचे अध्यक्ष, व्याख्याते, कथाकार, कवी व अन्य पाहुण्यांच्या नावांची चर्चा करण्यात आली. बैठकीत संघाचे उपाध्यक्ष शिवराज कालकुंद्रीकर, माजी अध्यक्ष अरुण पाटील, बसवंत शहापूरकर, भरमाणी डोंगरे, शिवाजी कुट्रे, विलास बामणे, सुधीर कुट्रे, दीपक होनगेकर, तानाजी कुट्रे, सुनील पाटील, संभाजी पवार आदींनी आयोजनासंदर्भात विविध सूचना मांडल्या. परंपरेप्रमाणे ४२ वे साहित्य संमेलनही उत्साहात व शिस्तबद्धरित्या साजरे करण्याचा निर्धार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *