Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

गोकाक येथे बसची वाट पाहणाऱ्या लोकांना कारने ठोकरले : एका महिलेचा मृत्यू

  गोकाक : गोकाक नाका क्रमांक १ जवळ बसची वाट पाहत असलेल्या बाराहून अधिक लोकांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले. गंगाव्वा फक्कीरस्वामीमठ (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. गोकाकानाका क्रमांक १ जवळ अनेक लोक बसची वाट पाहत उभे होते. …

Read More »

आम. आसिफ सेठ यांच्या हस्ते अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोनचे वितरण

  बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने मंजूर केलेल्या अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोन आणि आरोग्य किटचे वाटप केले. उत्तर विभागात येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांना कर्नाटक राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मंजूर झालेले स्मार्ट फोन, साड्या, आरोग्य किट आणि वह्या …

Read More »

वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासा : प्रा. अशोक आलगोंडी

  प्रा. अशोक आलगोंडी यांच्याकडून कागवाड शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप कागवाड : मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून पुस्तके वाचल्याने ते विचार करू लागतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासायला हवी. ग्रंथालयाला यापुढेही ग्रंथ मिळवून द्यायला सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. येथील सरकारी मराठी …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिक विद्यार्थ्यांची दिशाभूल! सातवीच्या पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती

  बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाप्रश्नासंदर्भात नेहमीच चुकीची माहिती पसरवत असतात. याचाच प्रत्यय यंदाच्या सातवीच्या अभ्यासक्रमात घेतलेल्या समाजविज्ञानच्या एका धड्यात आला आहे. कर्नाटक राज्य सरकारने “कर्नाटकाचे एकीकरण व सीमावाद” हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. यामध्ये सीमाप्रश्नासंदर्भात चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या २०२४-२५ च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा दि. २७ जून २०२४ रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकार ग्रहण सोहळा पार पडला. नूतन कार्यकारिणीत श्री. सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. …

Read More »

पारदर्शक, निष्पक्ष, सुलभ प्रशासन निर्माण झाले पाहिजे : अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांचे मत

  बेळगाव : नागरिकांना चांगल्या सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे. कर्नाटक प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनी मत व्यक्त केले की अलीकडे प्रशासनात बरीच सुधारणा झाली असली तरी पारदर्शकतेचा अभाव आहे आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. ते शुक्रवारी सुवर्ण …

Read More »

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसविरोधात भाजप रस्त्यावर

  बेळगाव : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने वाल्मिकी महामंडळाच्या 187 कोटी रुपये निधीचा गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहाराचा निषेध करत बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळाच्या 187 कोटी रुपये निधीचा गैरवापर केला आहे. या गैरवापराचा निषेध केला. भाजप नेत्यांनी मागणी केली की, …

Read More »

मराठीला अभिजात दर्जा मिळावा : प्रा. आनंद मेणसे

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक आनंद मेणसे, माजी मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण व नवोदित युवा कवी पूजा भडांगे यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर …

Read More »

शहर म. ए. समितीची रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सभासद आणि नागरिकांची बैठक रविवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जत्तीमठ किर्लोस्कर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे तरी सर्व संबंधितांनी वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव शहर समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

पायोनियर बँकेतर्फे सभासदांना आवाहन

  बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन बँकेतर्फे सभासदांच्या गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी, बारावी परीक्षेत 80 टक्के होऊन अधिक गुण मिळवले आहेत. पदवी, पदव्युत्तर परीक्षेत 60% होऊन अधिक गुण मिळवले आहेत, तसेच राज्य, राष्ट्रीय व …

Read More »