Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बडकुंद्री येथील जवानाचे श्रीनगरमध्ये हृदयविकाराने निधन

  अंकली (प्रतिनिधी) : भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील जवानांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून शिवानंद बाबू शिरगावे (वय 40) असे जवानाचे नाव असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बंधु असा परिवार आहे. सदर जवान जम्मू काश्मीर श्रीनगर येथे 55 आर आर बटालियनमध्ये …

Read More »

श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा पुण्यतिथी उत्सव ११ ऑक्टोबरपासून

  बेळगाव : थोर संतश्रेष्ठ व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११७ वा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला मंगळवार ११ ते गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बेळगांव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे साजरा होणार असून त्यानिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी …

Read More »

पतंग उडवताना इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू

  बेळगाव : पतंग उडवताना नजरचूकीने इमारतीच्या छतावरून पडून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी बेळगावातील अशोकनगरमध्ये घडली. 11 वर्षीय अरमान दफेदार या सेकंड क्रॉस, तिरंगा कॉलनी, उज्वल नगर येथे राहणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल, बुधवारी हा मुलगा त्याच्या कुटुंबीयांसह अशोकनगर येथील नातेवाईकाच्या घरी आला होता. …

Read More »

सोनिया, राहुलसमवेत ‘भारत जोडो’त आम. निंबाळकर, आम. हेब्बाळकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

  बेळगाव : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर व बेळगाव ग्रामीण आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पक्ष नेत्या सोनिया गांधी आणि युवा नेते राहुल गांधी यांच्या समवेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या पदयात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही सहभाग घेतला. सीमावर्ती खानापूर मतदारसंघात पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच …

Read More »

यरगट्टी येथे कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार

  यरगट्टी : यरगट्टी येथील मूट्टूत फायनान्सजवळ गुरुवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रक चालक रंगाप्पा पाटील (३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील गौडाप्पागौड अमरगौड (२५), वीरभद्रगौड एस. दबी (३२) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. …

Read More »

धर्मवीर संभाजीनगर सार्वजनिक सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उत्साहात

  बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील नियोजित नूतन सार्वजनिक सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी दुपारी 2:00 वा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, ज्येष्ठ वास्तूशास्त्र अभ्यासक सतीश निलजकर, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, …

Read More »

जिल्हास्तरीय माध्यमिक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव शहराला विजेतेपद

  बेळगांव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो क्रिकेट मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहराने विजेतेपद पटकाविले. उपांत्य सामन्यात बेळगांव तालुक्याने खानापूर तालुक्याचा 10 धावांनी पराभव केला. तर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगांव शहराने 14 षटकात 1 बाद 156 धावा केल्या त्यांच्या सिद्धेश …

Read More »

विजयादशमीनिमित्त उद्या येळ्ळूरमध्ये भारुड भजनी कार्यक्रम

  येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही विजयादशमी निमित्त श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर शिओली (ता. खानापूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भारुड भजनी कार्यक्रम बुधवार (ता. 5) रोजी रात्री 10-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या क्रीडापटूंची राज्यस्तरीय स्पर्धांकरिता निवड

  बेळगाव : नुकत्याच पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव व बेळगाव जिल्हा अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये संपन्न झालेल्या विविध क्रीडा प्रकारात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. विविध पदवी पूर्व कॉलेजच्या माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा उदा. कुस्ती स्पर्धेत कु. उमेश शीरगूम्पी 61 किलो …

Read More »

समर्थ नगर येथील नवरात्र उत्सव मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव एसटीएम समर्थ नगर बेळगाव येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी सहकुटूंब भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आजची श्री भवानी मातेची आरती जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांच्यावतीने सहकुटूंब करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांचा एसटीएमच्या सुनील कणेरी यांच्या वतीने सत्कार …

Read More »