Wednesday , July 29 2026
Breaking News

बेळगाव

कोरे गल्ली शहापूर पंच व युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आचरण

  बेळगाव : वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा दिन कोरे गल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …

Read More »

“ट्रीमॅन” किरण निप्पाणीकर यांचे हृदयविकाराने निधन

  बेळगाव : समाजसेवक (सेंट पाॅल स्कूलचे माजी विद्यार्थी) तसेच हॉटेल व्यावसायिक असणारे किरण यल्लाप्पा निप्पाणीकर यांचे गुरुवारी (27 फेब्रुवारी) प्रयागराज (उत्तर प्रदेश #महाकुंभमेळा) येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. जुनी मोठी झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी पहिला प्रयोग किरण निप्पाणीकर यांनी पिरनवाडी येथील …

Read More »

नेताजी हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन (कुसुमाग्रज जन्मदिन) उत्साहात साजरा

  बेळगाव : सुळगे (ये) नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन (कुसुमाग्रज जन्मदिन) साजरा करण्यात आला. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या फोटोचे पूजन दिलीप दामले हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय माजी शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील सर यांनी केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववीच्या …

Read More »

विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पहावे : आकाश शंकर चौगुले

  महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री. आकाश शंकर चौगुले आय आर एस …

Read More »

सांबरा येथे एटीएम फोडून लुटीच्या प्रकाराने खळबळ

    बेळगाव : सांबरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट …

Read More »

डॉ. शरद बाविस्कर यांचे बेळगावमध्ये आगमन; साठे प्रबोधिनी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

  बेळगाव : जे.एन.यू विद्यापीठाचे प्राध्यापक, फ्रेंच भाषेचे अभ्यासक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद बाविस्कर गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आज बेळगावमध्ये दाखल झाले. सांबरा विमानतळावर प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात कौटुंबिक वातावरण : मंगला मठद

  संजीवीनी फौंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील मी अनेक संस्थाना भेटी दिल्या आहेत पण संजीवीनी काळजी केंद्रात एक कौटुंबिक वातावरण पहायला मिळते, इथे प्रत्येक सणवार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. आज काळजी केंद्रात वास्तव्यास असलेले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित फॅमिली गेटटूगेदर ही संकल्पनाही नविन वाटल्याचे …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

  बेळगाव : येथील मराठा मंडळ फार्मासी महाविद्यालयात २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खोखो, क्रिकेट, थ्रोबॉल, हॉलीबॉल, रनिंग 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या शिष्टमंडळाने घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सहकाऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट. बाळेकुंद्री येथे अल्पवयीन मुलीला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाला भाषिक रंग देऊन सीमाभागात वातावरण खराब करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या दबावाखाली येऊन. उलट अमच्यावरच …

Read More »

रुद्रा जीमच्या ऋतिक पाटील, महेश गवळी यांचे स्पृहणीय यश

  बेळगाव : हिंडलगा येथील रुद्रा जीम या व्यायाम शाळेचे शरीर सौष्ठवपटू ऋतिक पाटील आणि महेश गवळी यांनी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या मि. एशिया -2025 या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत स्पृहणीय यश मिळविले आहे. युनायटेड इंटर कॉन्टिनेन्टल बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन (युआयबीबीएफ) संस्थेच्यावतीने आयोजित उपरोक्त स्पर्धा गेल्या रविवारी 16 …

Read More »