Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

आणखी एक झाड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान..!

  बेळगाव : बेळगावातील आरटीओ सर्कलजवळ झाड पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेपाठोपाठ आणखी एक झाड कोसळल्याची घटना आज घडली. विशेष म्हणजे वन खात्याच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली असून त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. बेळगाव येथील मार्केट पोलीस स्टेशन आणि वनविभागाच्या कार्यालयाजवळ मोठे झाड कोसळून इनोव्हा वाहनासह इतर वाहनांची नासधूस …

Read More »

आदर्श शिक्षक ए. पी. बेटगिरी यांचा सत्कार

  बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बेळवट्टी ता. जि. बेळगाव शाळेतील कन्नड शिक्षक ए. पी. बेटगेरी यांना यंदाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बेटगेरी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त बेळवट्टी शाळेची एसडीएमसी कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील …

Read More »

पंतप्रधान मोदी ते महात्मा गांधी यांच्या जन्म तारखेपर्यंत भाजपच्यावतीने विविध उपक्रम

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिनांक 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिनापासून दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जन्म दिनापर्यंत विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राज्यसभा सदस्य इरणा कडाडी यांनी दिली आहे. बेळगाव महानगर आणि ग्रामीण भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना इरणा कडाडी …

Read More »

सौन्दत्तीचे आमदार आनंद मामनी उपचारासाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल

  सौन्दत्ती : सौन्दत्ती मतदारसंघाचे आमदार, विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांना आरोग्य तपासणीसाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुमेहामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे उपचार करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांना मुलाच्या घरी विश्रांती घेत होते. आणि त्यांना दुसर्‍या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

  बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली. यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांचे शैक्षणिक कार्य अजरामर : बी. एस. येडियुराप्पा

  अंकली : संपूर्ण आशिया खंडात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्ञानदानाची गंगा उपलब्ध करून देणार्‍या बेळगाव येथील केएलई शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे त्याचबरोबर उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केएलई शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणारे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अजरामर आहे, असे प्रतिपादन …

Read More »

मच्छे-वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था

बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावरून जाताना भयानक खड्ड्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य जनतेकडून रस्ता दुरुस्तीसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मच्छे येथील रहिवासी राम पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना खड्ड्यांमुळे ते दुचाकीवरून पडून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली …

Read More »

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच राजमार्ग : समाजसेविका ज्योती गवी

  काकती ग्रामस्थ, प्रगतिशील परिषद व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे व्याख्यान आणि 130 शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न बेळगाव : देश व कुटुंबाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच राजमार्ग आहे. तळागाळापर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणे म्हणजे या देशातील गरिबांची संख्या कमी करणे आहे. तात्पुरता योजना देऊन तात्पुरती पोटाची भूक भागेल; पण त्याच्या आयुष्याची कायमची …

Read More »

संजीवनी आरोग्य योजनेचा लाभ द्या!

  महापालिका कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडे मागणी कामबंद आंदोलन छेडून महापालिकेसमोर निदर्शने बेळगाव : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजनेत समाविष्ट केले नाही. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आज बेळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. यावेळी आपल्या मागणी संदर्भात …

Read More »

पखवाजी बोंद्रे, कीर्तनकार जोशी यांचा पुण्यात हृद्य गौरव

बेळगाव : बेळगावचे प्रसिध्द पखवाजवादक व तबला शिक्षक हभप यशवंत पांडोबा बोंद्रे व कीर्तनकार गिरीश जोशी यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र धर्म जागरण अभियानतर्फे हजार कीर्तनाचा संकल्प करण्यात आला होता. त्या संकल्पपूर्ती निमित्ताने कीर्तनाला साथसंगत करणार्‍या साथीदारांचाही गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दि. 21 …

Read More »