बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. सुनिलकुमार लवटे अध्यक्षस्थानी राहाणार आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. साने गुरुजी यांचे २०२४ हे १२५ वे जयंती वर्ष …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक
बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक २९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे, तरी सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समितीच्या वतीने …
Read More »शहापूर म. ए समिती कार्यकर्त्यांची काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीस अध्यक्षस्थानी शिवाजी हावळानाचे होते. समिती नेते नेताजी जाधव, शुभम शेळके यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर यांनी मनोगत व्यक्त केले, बैठकीस सुनिल बोकडे, उमेश भातकांडे, मनोहर शहापूरकर, चंद्रकांत मजुकर, कुणाल कोचेरी, अतुल पारिशवाडकर, प्रकाश …
Read More »चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला निवड
बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी कुगजी हिने 600 मी रनिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर 3000मी रनिंग मध्ये मनश्री कुगजी प्रथम तर कनिष्का कुंडेकर 100 मी रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 4×400 मी रिलेमध्ये मनश्री कुगजी, रागिणी हट्टीकर, …
Read More »काळा दिन, महामेळाव्याला परवानगी देऊ नका…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबरला काळ्या दिनाला परवानगी देऊ नये आणि हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करू देऊ नये, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिका शिवराम गौडा गटाच्या वतीने आज बेळगाव येथे आंदोलन करण्यात आले. आज बेळगाव येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवराम गौडा गटाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल …
Read More »कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार
बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा दिनाची फेरी काढली होती. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे यावेळी ही सायकल फेरी काढली जाणार आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशी माहिती शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. आम्ही ६८ वर्षांपासून काळा …
Read More »जगातील अव्वल दानशूर रतन टाटा : प्रा. डॉ. चेतन कोटबागे
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने उद्योगरत्न रतन टाटा यांची आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रतन टाटा यांच्या फोटोला पाहूण्यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. पाहूण्यांचे स्वागत अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी केले.सर्वांचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर …
Read More »पोलिसांनी केलेल्या फायरींमुळे अपहरण केलेल्या दोन मुलांची सुटका
बेळगाव : अथणी तालुक्यातील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या 4 आणि 3 वर्षांच्या दोन लहान मुलांचे अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा जणांवर पोलिसांनी फायरिंग केल्यामुळे मुलांची सुखरूप सुटका झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या भावंडांची नावे स्वस्ती देसाई आणि वियोम …
Read More »कुरिहाळ येथून बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा या गावासाठी सकाळी 7:30 वाजता परिवहन बस सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदर गावातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बससेवेच्या मागणीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा गावातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज गुरुवारी सकाळी ॲड. एन. आर. लातूर यांच्या …
Read More »दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार कोसळला दरीत
बेळगाव : दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार खोल दरीत पडून अपघात झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात घडली आहे. मात्र या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे. सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवस्थान परिसरात हा अपघात घडला. सौंदत्तीहुन यल्लम्मा देवस्थानाकडे जात असताना दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसहित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta