Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची कार्यकारिणी जाहीर

बेळगाव : कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल. अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष-रमेश पावले, सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्नवर, शिवराज पाटील, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, स्वागताध्यक्ष-मदन बामणे, …

Read More »

देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात उत्साहात

  बेळगाव : सामाजिक समतेचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव शहरात आज, शनिवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगर पालिका आणि देवराज अरसू विकास महामंडळ यांच्या सहयोगाने सामाजिक समतेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री देवराज अरसू यांच्या …

Read More »

जन्माष्टमी महोत्सवाची सांगता

बेळगाव : आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने गेल्या आठवडाभर चाललेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची शनिवारी दुपारी सांगता झाली. काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन आज शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रभुपाद यांच्यासाठी आज श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विशेष पूजेचे आयोजन …

Read More »

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला किरण जाधव यांच्याकडून आवाहन

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव,  गुणवंत पाटील, सुनील जाधव, अक्षय साळवी, राजन जाधव यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे. कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे व मराठा समाजाचे …

Read More »

माध्यान्ह आहाराचे नवे अधिकारी लक्ष्मण यकुंडी

खानापूर (विनायक कुंभार) : खानपूरचे यापूर्वीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांची मध्यान्ह आहार जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी 24 जून रोजी झालेल्या बदली प्रक्रियेत यकुंडी यांची मुनिराबाद जिल्हा कोपळ येथे डायटचे प्रमुख व्याख्याते म्हणून बादली झाली होती. या पदावर हजर न होता ते बेळगावात बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होते. यानुसार …

Read More »

युवक काँग्रेसकडून सिद्धरामय्यांवर अंडी फेकल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मडिकेरी येथे अंडी फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आज युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. मडिकेरी येथे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकणार्‍यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज बेळगावमध्ये युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. शहरातील चन्नम्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप …

Read More »

टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक; 2 ठार

  बेळगाव : अथणीपासून मिरज रोडवर टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. तर सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटरवर …

Read More »

अथर्व फाउंडेशनचे दुसरी लॅब रविवारपासून बेळगावात

बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्व फाउंडेशनच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारपासून आणखी एक शाखेचा प्रारंभ करण्यात येत आहे. रक्त, लघवी तपासणीचा वाजवी दरात मिळणारा अचूक रिपोर्ट …

Read More »

इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे दिनांक 21 ते 27 ऑगस्ट हे 7 दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही भाषेत होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? …

Read More »

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात संपन्न

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. बलराम जयंती म्हणजे 13 ऑगस्टपासून रोज सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष प पु भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन झाले. शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता विशेष प्रवचनाने कथा महोत्सवाची सांगता झाली. …

Read More »