Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कॅम्प परिसरातील रहिवाशांचे आंदोलन

  बेळगाव : दोन दिवसांत दोन शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू होऊनही बेळगाव पोलिसांना गांभीर्य वाटलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कॅम्पवासीयांनी आज सकाळी आंदोलन केले. बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात स्पीडब्रेकर बसवावेत आणि शाळेच्या वेळेत पोलिस तैनात करावेत, या मागणीसाठी कॅम्पवासियांनी आंदोलन केले. बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांत …

Read More »

श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने

बेळगाव : बाजार गल्ली वडगाव येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव दि. 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. 7 ते 9 पर्यंत डोंबिवली (मुंबई) येथील प्रसिध्द कीर्तनकार हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने होणार …

Read More »

केदनूर ग्रामस्थांचे माजी सैनिकाविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

  बेळगाव : श्रावण मासानिमित्त केदनूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजन आणि पूजा कार्यक्रमादरम्यान एका माजी सैनिकाने मंदिरात धुडगूस घालून माईक तोडल्याचा प्रकार केला. सदर माजी सैनिकाने येथील भाविकांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ देखील केली असून याप्रकरणी न्याय मागण्यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई देवस्थानात …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 122 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य गोविंद राऊत यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर गोविंद राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती …

Read More »

रस्त्यावरच्या आंदोलनातूनच प्रशासनाला ताकद दाखवून देऊ

  महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत झालेल्या या बैठकीत नेहमीप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांनी मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात हातवर केले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनातूनच शासनाला आमची ताकद दाखवून देऊ असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. मराठी …

Read More »

हत्तरगीजवळ महामार्गावर भीषण अपघात : एक मुलगा ठार, 5 जखमी

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेत एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वडूज गावातील साजिद मुल्ला आणि त्याचे कुटुंबिय कारने कित्तूरला अंत्यसंस्कारासाठी जात असताना सकाळी 8.30 च्या सुमारास हत्तरगीजवळ हा अपघात झाला. या घटनेत सिद्दक …

Read More »

ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करू; दीपक दळवी

बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची जिद्द आणि मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. शहर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. समितीची चळवळ ही कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली आहे. मराठी …

Read More »

शिरगुप्पीच्या तरुणाचे दहशतवादी कनेक्शन!

  बेळगाव : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समाजविघातक कृत्यांमध्ये सामाजिक शांतता बिघडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागही याचा तपास सुरू करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहमद सिद्दिकी याला अटक केली असता त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि.बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा …

Read More »

ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बेळगाव : अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जुन्या भाजी मार्केट जवळील पेट्रोल पंपाजवळ सकाळी सकाळी ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज सकाळी फिश मार्केटजवळ कॅम्प येथे ट्रकच्या धडकेत इस्लामिया उर्दू शाळेचा विद्यार्थी अरहान बेपारी याचा जागीच मृत्यू झाला. बहीण अतिका ​​आणि आयुष आजरेकर हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी …

Read More »

इंडियन कराटे क्लबने जिंकली जनरल चॅम्पियनशिप!

  बेळगाव : दि. 31जुलै 2022 रोजी शाईन स्पोर्ट्स कराटे अकॅडमी यांच्यावतीने सुलेमानिया हाॅल लक्षमेश्वर, गदग येथे झालेल्या 4थ्या नॅशनल इनविटीशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या इंडियन कराटे क्लबला एकूणच प्रथम जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 144 कराटेपटू सहभागी होऊन त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत 88 सुवर्ण, …

Read More »