Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

‘कॅपिटल-वन’तर्फे अ. भा. मराठी एकांकिका लेखन स्पर्धा

  बेळगाव : बेळगांव येथील कॅपिटल-वन या संस्थेच्यावतीने अखिल भारतीय स्तरावरील भव्य खुल्या मराठी एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मराठी एकांकिका लेखन स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. 11000/-, रु. 7000/- आणि रु. 5000/- मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहीती संस्थेचे …

Read More »

महाराष्ट्रात हद्दीत सीमावासियांचा रास्तारोको

  शिनोळी : कर्नाटकाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्यात येतो. मात्र गेल्या वर्षांपासून महामेळाव्याला परवानगी नाकारण्याचे षडयंत्र कर्नाटक सरकार करत आहे. या वर्षीही बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरात जमावबंदी आदेश जारी करून कायदा व सुव्यवस्थेचे तकलादू कारण देत महामेळाव्याला परवानगी नाकारली. त्यामुळे म. ए. समितीने …

Read More »

बेळगावात आजपासून हिवाळी अधिवेशन

  बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवार दि. ४ पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जोरदार खडाजंगी रंगण्याची चिन्हे आहेत. पाच राज्यांतील निकालाचेही पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. परिणामी भाजपकडून …

Read More »

महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने शिनोळी येथे रास्ता रोको

  बेळगाव : कर्नाटक सरकारने दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात एक पत्र ही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे. याची …

Read More »

येळ्ळूरवासीय महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार!

  बेळगाव : 4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार हे हिवाळी अधिवेशन दर वर्षी बेळगावमध्ये भरवत आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. या …

Read More »

महामेळावा पूर्वतयारीसाठी उद्या व्हॅक्सीन डेपो येथे समिती कार्यकर्त्यांनी जमावे

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता व्हॅक्सीन डेपो टिळकवाडी बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी रविवार दिनांक 3 रोजी सकाळी 11.00 वाजता व्हॅक्सिन डेपो येथे जमावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

5 लाख रू. किमतीची बेकायदेशीर दारू जप्त

  बेळगाव : गोव्याहून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू रिक्षातील 5 लाख रुपये किमतीच्या दारू साठ्यासह एकूण 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त करून दोघांना अटक केल्याची घटना आज शनिवारी सकाळी बेळगाव -सावंतवाडी रस्त्यावरील बाची तपासणी नाक्याच्या ठिकाणी घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, बाची तपासणी नाक्याच्या ठिकाणी …

Read More »

हलगा -बेळगाव सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी हलगा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

  बेळगाव : हलगा गावानजीकचा अलारवाड अंडर ब्रिज सर्कल आणि हलगा -बेळगाव सर्व्हिस रोड रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसह आपल्या अन्य मागण्यांची येत्या चार दिवसात पूर्तता न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा हलगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिला. हलगा ग्रामस्थांनी आज शनिवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त इशाऱ्याचे …

Read More »

बस सुविधेच्या मागणीसाठी सांबरा गावात विद्यार्थ्यांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावातील सांबरा गावात विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत बस सुविधेची मागणी करत आंदोलन केले. विद्यार्थ्यांना शक्ती योजनेमुळे समर्पक बससेवा मिळत नसल्याचा संताप बेळगाव ग्रामीण मंडळाचे भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी व्यक्त केला असून मोफत बस प्रवासाची योजना जनतेची डोकेदुखी बनली आहे. बेळगावातील सांबरा गावात विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत बस सुविधेची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन उद्घाटन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनासाठी चांद्रयानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती… आर्यन पाटील या विद्यार्थ्यांने ही प्रतिकृती तयार केली होती. विद्यार्थ्यांना निसर्गातील …

Read More »