Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

बेळगाव : बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून नागरिकांवर भलते सलते गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी …

Read More »

जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय?; अतिवाडमध्ये महिन्याभरात दोन लाखांच्या गवत गंजीना आग

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या महिनाभरापासून गावातील शेतकऱ्यांच्या गवत गंजींना आग लावण्याचा प्रकार सुरुच आहे. आतापर्यंत पाच गवत गंजी अज्ञाताने पेटवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे पण मुक्या जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावत आहे यांचा पोलिसांना शोध घेणे गरजेचे आहे. …

Read More »

शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पायोनियर बँकेचा सन्मान

बेळगाव : “देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे. पण आपल्याला येथे थांबून चालणार नाही पुढची शंभर वर्षे कशी प्रगती करता येईल त्याचा विचार …

Read More »

3 महिन्याचा पगार द्या; अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी

बेळगाव : सरकार अंगणवाडी सेविकांकडून सर्व ती कामे करून घेतो, मात्र त्यांचे वेतन वेळेवर देण्यात येत नसल्याने आज सीआयटीव्हीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थकित आहेत. सध्या शाळा कॉलेज सुरू झाले असल्याने मुलांना शिक्षणाकरिता लागणारे …

Read More »

बसवण कुडची येथे पायी पंढरपुर दिंडीला जाणार्‍या वारकर्‍यांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा

बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील बसवण कुडची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळतर्फे पायी पंढरपुर दिंडी काढण्यात येत आहे. आज मंगळवार दिनांक 28 जुन 2022 रोजी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशिर्वाद घेतला व या दिंडीला जाणार्‍या सर्व वारकर्‍यांना शुभेच्छा …

Read More »

सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर पुजार्‍यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. दर्शनाकरिता ते 100 ते 200 रुपये आकारत आहेत तसेच देवीचे थेट दर्शन घेण्याकरिता 500 रुपये आकारात आहेत. येथील देवीच्या दरबारात खुलेआम भाविकांची लुबाडवूक होत आहे. त्यामुळे आज येथील जय भीम ओम साई संघटनेच्या वतीनेयल्लमा देवीचा डोंगरावरती सुरू …

Read More »

के. के. कोप्प येथे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ता कामाला चालना

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकासकामे विविध टप्प्यात राबविण्यात येत असल्याची माहिती आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे 38 लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्ता कामाला भूमिपूजन करून चालना दिल्यानंतर त्या बोलत होत्या. आ. हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो …

Read More »

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांची ऐतिहासिक ठिकाणांना भेट

बेळगाव : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी बेळगावातील विविध महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतली. बेळगावातील किल्ला परिसरातील ऐतिहासिक कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम आदी ठिकाणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी भेट देऊन माहिती घेतली. 3 दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर असलेल्या सोमप्रकाश यांनी सोमवारी सुवर्णसौधमध्ये …

Read More »

जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदलीचा आदेश जारी

बेळगाव : दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर त्यात भर म्हणून आता विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जारी करण्यात आलेल्या सदर आदेशानुसार बेळगाव द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पवनेश डी. यांची प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बदली झाली आहे. तृतीय अतिरिक्त …

Read More »

गोवावेस येथील ईएसआय क्लिनिकचे स्थलांतर; नोंद घेण्याचे आवाहन

बेळगाव : गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील ईएसआय क्लिनिक आता खाऊ कट्टा समोरील आदिशक्ती इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील कांही वर्षे याच इमारतीत हे क्लिनिक सुरू राहणार असून ईएसआय संबंधित कामगारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य …

Read More »