Monday , September 21 2026
Breaking News

सौंदत्ती येथील श्रीक्षेत्र रेणुका मंदिराला 11.23 कोटींची देणगी

Spread the love

 

बेळगाव : सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीच्या देणगीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील वर्षभरात देवीला 11 कोटी 23 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. 2022-23 सालच्या तुलनेत दोन कोटी चाळीस लाख रुपयांची वाढ झाली आहे. दुष्काळाच्या छायेतही भाविकांचा उत्साह वाढला असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी मंदिराला आलेले देणगीची माहिती देण्यासाठी कार्यकारी अधिकारी महेश यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी 2023- 24 साला सौंदत्ती रेणुका देवी मंदिराला नेहमीच्या स्वरूपात 11 कोटी 23 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती दिली.

देवीला दहा कोटी बावीस लाख रुपये रोख, 84 लाख 14 हजार रुपयांचे सोने, 16 लाख 65 हजार रुपयांची चांदी देवीला देणगीच्या स्वरूपात प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराला देणगी स्वरूपात मिळणारा महसूल मंदिराच्या विकासासाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कृती आराखडा तयार करून तो सरकारच्या मंजुरीसाठी पाठवून दिला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळतात देणगी स्वरूपात जमा झालेल्या महसुलातून मंदिर परिसरात विकासाची कामे हाती घेतली जाणार असल्याचे महेश यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *