Monday , September 21 2026
Breaking News

दुचाकी चोराला एपीएमसी पोलिसांकडून अटक; 4 दुचाकी जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील सदाशिव नगर व खडेबाजार येथे पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या संजू मल्लाप्पा मेकली याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावातील सदाशिव नगर आणि खडेबाजारात उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याच्या घटना घडल्यानंतर अशा दुचाकी चोरांना शोधण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर आरोपी संजू मल्लाप्पा मेकली याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1,35,000 किमतीच्या 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *