Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

बेळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत पाच दुकाने फोडली

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीसह विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एका रात्रीत पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आज शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी धुडगूस घातल्याने पोलिसांसमोर चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.   पांगुळ गल्ली आणि …

Read More »

शब्दगंध कवी मंडळाचा वर्धापन दिन उद्या

  कवी आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळाचा ३३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयात होणार आहे. प्रा. अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमात कवी आबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …

Read More »

मंगल संताजी हिची राज्य पातळीवर निवड

  बेळगाव : हलगा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी कु. मंगल केदारी संताजी हिची राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सरकारी प्राथमिक मराठी शाळा हलगा शाळेची विद्यार्थ्यांनी मंगल केदारी संताजी हिने …

Read More »

ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

  बेळगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रात्री 9 च्या सुमारास बेळगाव बस स्थानकाजवळील सर्किट हाऊस समोर घडली. मोहन भरमा पाटील (वय 55) रा. मंडोळी असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकने मोहन पाटील यांच्या स्प्लेंडर दुचाकीला …

Read More »

महापालिका वाद राज्यपालांच्या दरबारी; महापौरांनी घेतली राज्यपालांची भेट

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील वाद आता थेट बेंगळूरच्या राजभवनात पोहोचला आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन महापालिकेच्या कारभारात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्तक्षेपाविरोधात तक्रार केली आहे. करवाढीच्या ठरावात बेकायदा दुरुस्ती, महापौरांच्या सहीची फाईल गहाळ होणं आदी कारणावरून …

Read More »

येळ्ळूर नेताजी युवा संघटना आयोजित भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ प्रथम

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा …

Read More »

बेळगावात राजकीय महायुद्ध; महापौर घेणार राज्यपालांची भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यात राजकीय युद्ध सुरूच आहे. हे युद्ध दोन नेत्यांमधील राजकीय युद्ध नसून, हे बेळगाव जिल्ह्याचे राजकीय विश्वयुद्ध आहे, यात शंका नाही. स्मार्ट सिटी, बुडा जमीन वाटप, महानगरपालिकेमध्ये आमदार अभय पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप मंत्री सतीश …

Read More »

शहापूर भागात काळ्या दिनासंदर्भात जनजागृती

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर भागात 1 नोव्हेंबर, काळादिन हरताळ पाळण्यासाठी जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. राजकुमार बोकडे होते तर गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर, सुनील बोकडे, रणजीत हावळानाचे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस महेश कुंडेकर, रजत बोकडे, रवी जाधव, परशराम शिंदोळकर, महेश पाटील, रोहित वायचळ, दीपक …

Read More »

येळ्ळूरमधून हजारोंच्या संख्येने सहभागी होणार

  बेळगाव : दिनांक 25/10/2023 रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त बालशिवाजी वाचायल येथे बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील होते. येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते, माजी तालुका पं. सदस्य रावजी पाटील यांनी आपल्या विचार व्यक्त करत 1 …

Read More »

महापौर शोभा सोमनाचे यांचे राज्यपालांना पत्र!

  बेळगाव : महानगरपालिकेत महापौरांची स्वाक्षरी असलेली फाईल गहाळ त्याचबरोबर नियमबाह्य दुरुस्ती याबाबत प्रशासन आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू होती. या वादाने आता गंभीर वळण घेतले असून महापौर शोभा सोमनाचे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महानगरपालिकेतील प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी मुदत मागितली आहे. आज महानगरपालिकेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »