Saturday , November 7 2026
Breaking News

सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा आदर्श शाळा पुरस्कार

Spread the love

 

येळ्ळूर : मराठा मंदिर येथे आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आदर्श शाळा पुरस्कार व सामान्यज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये 2023-24 सालातील पाच मतदारसंघातील आदर्श शाळा निवडण्यात आल्या होत्या. यामध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा येळ्ळूर या शाळेला सलग तिसऱ्यांदा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून बेळगाव दक्षिणमधून निवड करण्यात आले त्याचबरोबर सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले त्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यामध्ये कुमारी वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर हिचा दुसरा क्रमांक, श्रावणी राजेंद्र नायकोजी विभागून पाचवा, वैदेही संतोष पाटील व क्रांती लक्ष्मण घाडी, विभागून सहावा, आचल प्रमोद देसुरकर विभागून आठवा, जिग्नेश रवींद्र गुरव विभागून नववा, जयदीप शिवाजी खेमनाकर व समर्थ संदीप मेलगे यांना उत्तेजनार्थ असे एकूण आठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे व आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. या बक्षीस वितरण समारंभ वेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *