बेळगाव : बेळगावच्या सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ सदस्य आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »काकती येथील आजारी वृद्धाचा तोल जाऊन रस्त्यावरच मृत्यू!
बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या एका वृद्धाचा जिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. बेळगावच्या किल्ला तलावाजवळ ही करुण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या किल्ल्यासमोर हा प्रकार घडला, मृताची ओळख काकती गावचे गणपती पाटील (वय ६५) अशी पटली …
Read More »बेळगावच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : बेळगाव मधील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. बेळगाव मधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात निर्माण झालेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय, गृह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वस्तीगृहाचे कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शहर बस स्थानकाचे उद्घाटन आणि राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत निर्माण होणाऱ्या इमारत …
Read More »बेळगाव सीमा प्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात ठोस चर्चा व्हावी
ठाणे : “बेळगाव कुणाच्या बापाच,ते मराठी माणसांच्या हक्काचं” या पुस्तकाचे युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी सातारा येथे भरणाऱ्या ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आपले गुरूवर्य सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या समोर बेळगाव सीमा प्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात ठोस चर्चा व्हावी. बेळगाव सीमा …
Read More »महामेळावा खटला सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर
बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णसौध येथे अधिवेशन घेतले त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे २०१७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी घेतली नाही, म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. ३ रोजी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये होती. मात्र, …
Read More »खडक गल्ली परिसरात दगडफेक
बेळगाव : बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली. दरवर्षी, शनिवारी खुंट आणि जलगार गल्लीमार्गे उरूस मिरवणूक काढण्यात येते. मात्र या वर्षी परवानगीशिवाय मिरवणूक खडक गल्लीत दाखल झाली. या परिसरात कधीही न आलेली मिरवणूक आता का आली आहे? असे काहींनी विचारले …
Read More »भाषा टिकविण्यात पत्रकारांचे योगदान मोठे; सार्वजनिक वाचनालयातर्फे चर्चासत्र संपन्न
बेळगाव : “वृत्तपत्रे म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज होय. भाषा टिकविण्याचे आणि वाढविण्याचे कार्य करण्यामध्ये वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे” असा सूर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या चर्चासत्रात उमटला. येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन आणि अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाने झाला. सार्वजनिक वाचनालयाचे …
Read More »उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर यांचे निधन
बेळगाव : उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष, बालवीर सेवा मंडळाचे संस्थापक सदस्य, बालवीर अर्बन संस्थेचे संस्थापक चेअरमन, बालवीर विद्यानिकेतनचे संचालक, ढेकोळकर ट्रेडर्सचे मालक, व तालुका पंचायत माजी सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष गीता ढेकोळकर यांचे पती, ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा ढेकोळकर (KG) यांचे वडील बंधू यल्लाप्पा गावडू …
Read More »युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत …
Read More »चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदून गटारी भरल्या मातीने; नागरिक डासांनी हैराण
बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने वडगाव चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदण्यात आली. मात्र कुपनलिका खोदून या ठिकाणची माती गटारीतच पडून राहिली आहे. त्यामुळे गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे तक्रारही नोंदवली. दरम्यान वीस दिवस उलटूनही गटारीतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta