बेळगाव : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खाजगी व अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. मात्र यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून पालकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. बदलती नियमावली, ऑनलाइन …
Read More »कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांचे काव्यवाचन शनिवारी
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने राबविण्यात येत असलेल्या “कवी समजून घेताना” या उपक्रमांतर्गत शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावतर्फे सातवे पुष्प म्हणून ‘स्वरूपायन’ या विशेष काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात येणार असून हा …
Read More »सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी सावध राहा; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा
बेळगाव : सोशल मीडियाचा गैरवापर करून प्रक्षोभक मजकूर, धमकीचे व्हिडिओ किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष सायबर सेलची स्थापना केली आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. सायबर सेलची विशेष टीम सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्ट, द्वेषपूर्ण संदेश तसेच ऑनलाइन माध्यमातून धमकीचे संवाद …
Read More »नेत्रदान हे अत्यंत पवित्र व कल्याणाकारी कार्य : डॉ. शुभांगी पाटील
जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने नेत्रदान जनजागृती बेळगाव : राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती दिनानिमित्त जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी पाटील यांनी विद्यार्थिनींना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाल्या की, नेत्रदान हे अत्यंत …
Read More »मराठी भाषेसाठी म. ए. समितीचा 22 जून रोजी मोर्चा; पोलिस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कांशी कन्नडसक्ती रोखण्यासाठी २२ जून रोजी बेळगावात शांततापूर्ण मोर्चा म. ए. समितीचे काढण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक परवानगी देण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे …
Read More »सार्व. वाचनालयातर्फे साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने
बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे आज गुरुवारी साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »कुद्रेमानीतील लोहार बंधूंकडून श्री महालक्ष्मी देवीला सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण अर्पण
कुद्रेमानी ( प्रतिनिधी) : कुद्रेमनी गावच्या ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेचे औचित्य साधून लोहार कुटुंबीयांनी भक्तिभावाने सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण देवीचरणी अर्पण केले. या धार्मिक व मंगलमय सोहळ्यामुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली. स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र व कुशल कारागिर भरमाणा अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार …
Read More »मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन; विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनाही पाठिंब्याचे पत्र
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा एकदा वेग देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलावण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला असून, या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने येत्या रविवारी दहावीच्या गुणवंतांचा सत्कार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये मराठी माध्यमात बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातून प्रत्येकी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न …
Read More »न्यू गुड्सशेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारे बांधावीत, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta