Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

हणमंतगौंड नगर येळ्ळूर येथे नवीन बस थांब्यासाठी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

  येळ्ळूर : हणमंतगौंड नगर, येळ्ळूर येथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिसरात नवीन बस थांब्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला एक लेखी निवेदन माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रण अधिकारी के. एल. गुड्डण्णावर आणि के एस आर टी सी अधिकारी …

Read More »

सराफ कॉलनीतील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपले; नागरिकांमध्ये संताप

  बेळगाव : अजंटा हॉटेलच्या पाठीमागील सराफ कॉलनी परिसरात ड्रेनेजच्या गळतीमुळे सहा उघड्या विहिरी आणि एका बोअरवेलमधील पाणी दूषित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही ड्रेनेज मॅनहोलमधून सांडपाण्याची गळती होत असल्याने …

Read More »

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

  बेळगाव : लग्नाच्या आनंदाला अवघा महिना उलटत असतानाच एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव शहरात घडली आहे. महाद्वार रोड परिसरातील अष्टेकर गल्ली येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षिता पुजारी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह मंजुनाथ कृष्णा पुजारी याच्यासोबत …

Read More »

महागाईची झळ सलून व्यवसायालाही; दाढी-केस कर्तनाच्या दरात २० टक्क्यांची वाढ

  बेळगाव : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या वाढत्या महागाईची झळ आता सलून व्यवसायालाही बसली आहे. वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाल्याने शहापूर सलून असोसिएशनने दाढी, केस कर्तन आणि इतर सलून सेवांच्या दरात २० टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांना सलून सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवा; मंत्री उदय सामंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय, कन्नड सक्ती आणि विविध प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी …

Read More »

आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीची तारीख जाहीर होणार

  बेळगाव : महाराष्ट्रातील आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत दादा कोंडुसकर यांना दिली. मुंबई येथील मंत्रालयात ९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोंडुस्कर यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी सामंत …

Read More »

‘शिवम’ घोटाळ्याचे बॉलिवूड कनेक्शन; सनी लिओनी सीआयडीच्या रडारवर

  बेंगळूर : बेळगावातील ‘शिवम असोसिएट्स’च्या कोट्यावधीं रुपयांच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला नोटीस बजावली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार केला आहे. कंपनीचे मालक शिवानंद निलण्णावर यांनी नागरिकांनी गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मोठा हिस्सा सनी लिओनीसह चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूलचा कॉलम भरणी समारंभ उत्साहात

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल, वाघवडे नूतन इमारत कॉलम भरणी समारंभ सोमवार दिनांक ८ जून 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष द.म.शि. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. ॲड. राजाभाऊ पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत इमारत बांधकाम कमिटीचे अध्यक्ष श्री आर …

Read More »

‘२५ लाख मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळू नका’; आमदार आसिफ सेठ यांना शुभम शेळके यांचा कडक इशारा

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असून सीमा प्रश्नाविरोधी ठराव मी स्वतः मांडेन” असे केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विधानामुळे सीमाभागातील सुमारे २५ लाख मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, …

Read More »

केपीआयडी कायदा रद्द करा किंवा तांत्रिक अडथळे दूर करा; रायण्णा सोसायटी ठेवीदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  बेळगाव : केपीआयडी (KPID) कायद्याअंतर्गत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप करत संबंधित अडथळे तातडीने दूर करावेत, अन्यथा केपीआयडी कायदाच रद्द करावा, अशी मागणी ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या ठेवीदारांनी ॲड. एन. …

Read More »