Monday , September 21 2026
Breaking News

‘शिवम’ घोटाळ्याचे बॉलिवूड कनेक्शन; सनी लिओनी सीआयडीच्या रडारवर

Spread the love

 

बेंगळूर : बेळगावातील ‘शिवम असोसिएट्स’च्या कोट्यावधीं रुपयांच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला नोटीस बजावली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार केला आहे. कंपनीचे मालक शिवानंद निलण्णावर यांनी नागरिकांनी गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मोठा हिस्सा सनी लिओनीसह चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना हस्तांतरित केल्याचे सीआयडीच्या तपासात उघड झाले आहे.

बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुळेद म्हणाले, ‘शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांनी जनतेचा पैसा चित्रपट कलाकारांना दिल्याची स्पष्ट माहिती आम्हाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सनी लिओनीसह इतर अभिनेते आणि अभिनेत्रींना आम्ही नोटीस बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *