Monday , September 21 2026
Breaking News

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूलचा कॉलम भरणी समारंभ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल, वाघवडे नूतन इमारत कॉलम भरणी समारंभ सोमवार दिनांक ८ जून 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष द.म.शि. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. ॲड. राजाभाऊ पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत इमारत बांधकाम कमिटीचे अध्यक्ष श्री आर के पाटील सरांनी केलं. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ए.के.पी ‌फौंड्री प्रा. लि.चे चेअरमन श्री. राम बळवंत भंडारी यांचे प्रतिनिधी ए.के.पी फौंड्रीचे आर्थिक सल्लागार श्री. देशपांडे साहेबांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गोकुळ मेटाटेक प्रा. लि.चे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री. नितीन लांडगे साहेबांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रा. विक्रम पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. श्री. नितीन लांडगे साहेबांनी आपले विचार मांडले तसेच नूतन शाळा बांधकाम करताना वेळोवेळी मदत करण्याचे जाहीर केले.

श्री. राजाभाऊ पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. श्री. देशपांडे, श्री. नितीन लांडगे, श्री नटराज लोहार, श्री. विक्रम पाटील, श्री. पी. पी. बेळगावकर, श्री. बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते कॉलम भरणीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री. डी बी पाटील, इमारत बांधकाम कमिटीचे उपाध्यक्ष श्री. जोतिबा आंबोळकर, प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. संतोष आंबोळकर, श्री. एम टी आंबोळकर, श्री. रमाकांत बुवाजी, श्री. प्रशांत देसाई, श्री. दीपक आंबोळकर, श्री. नागेंद्र पाटील, श्री व्यंकट गुरव, श्री. सागर गुरव, श्री. राजू लोहार, श्री. सुनील पाटील, श्री. शांतिनाथ बुवाजी तसेच शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, बांधकाम कमिटीचे सर्व सदस्य, बालक- पालक ग्रामस्थ व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील सरांनी केले व आभार श्री. ए. एम साबळे सरांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *