Monday , November 23 2026
Breaking News

बेळगाव

“त्या” खांबांच्या वायरी पुन्हा उघड्या; दुर्घटनेची भीती

  बेळगाव : भारतनगर येथील युनियन बँकेसमोरील खुल्या जागेत मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या शोभेच्या विद्युत खांबांच्या तळाशी पुन्हा उघड्या विद्युतवाहिन्या दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी रयत गल्लीतील म्हशी या परिसरात चरण्यासाठी गेल्या असताना, शोभेच्या विद्युत खांबाच्या तळाशी असलेल्या उघड्या विद्युतभारित वायरचा …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित सर्व हायस्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या वतीने संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी सर्व विषयांची विशेष कार्यशाळा ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील होते. प्रारंभी एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी मुख्याध्यापक …

Read More »

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराचे वर्चस्व

      चारही गटांत विजेतेपद; विभागीय स्पर्धेसाठी संघ पात्र बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराने चारही गटांत विजेतेपद पटकावत वर्चस्व सिद्ध केले. प्राथमिक मुलांच्या गटात अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल, बेळगाव शहर …

Read More »

श्री गणेश ग्रामीण बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुनिल भातकांडे ठरला ‘टायटल विनर’

  बेळगाव : श्री गणेश ग्रामीण स्तरावरील बॉडीबिल्डिंग स्पर्धा २०२६ चे आयोजन टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालयात करण्यात आले. विविध वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली. ५५ किलो वजनी गटात पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आकाश जोगाणी द्वितीय, प्रथमेश निर्मळे तृतीय, शुभम चौगले …

Read More »

ॲड. सुधीर चव्हाण यांचा तंजावर साहित्य संमेलनात राजेंच्या हस्ते सत्कार

  तंजावर : ऐतिहासिक तंजावर नगरीत नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांचा संमेलनाचे उद्घाटक छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा …

Read More »

बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था पुणे वार्षिक सभा उत्साहात

  सभासदांना १२ टक्के लाभांश; आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरव पुणे : बेळगावकरांनी पुणेस्थित बेळगावकरांसाठी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सन ७७, लक्ष्मीनारायण पार्क, शॉप नं. ११, ससाणेनगर, हडपसर, पुणे-२८ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी वडगाव खु, पुणे येथील क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, स्वर्गीय …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश; पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

  ​बैलहोंगल / बेळगाव : पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि के. एल. ई. पदवी पूर्व महाविद्यालय, बैलहोंगल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या पाच …

Read More »

भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी गल्लीवार बैठका घेणार

  मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सभेत निर्णय; शैक्षणिक निधी उभारण्यावरही भर बेळगाव : मराठा समाजातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सकारात्मक दिशा देण्यासाठी गल्लीवार व विभागवार बैठका घेऊन विचारमंथन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या सभागृहात …

Read More »

‘भावनांचे भोळे पक्षी’ काव्यमैफिलीने बेळगावकर रसिक मंत्रमुग्ध

  कवी जितेंद्र रेडेकर यांच्या भावस्पर्शी कवितांना दाद : शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगावतर्फे आयोजित आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने ‘कवी समजून घेतांना’ या उपक्रमांतर्गत (पुष्प १० वे) “भावनांचे भोळे पक्षी” हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम शनिवारी …

Read More »

दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या; बैलहोंगलजवळ खळबळ

  बेळगाव : बैलहोंगल शहराच्या बाहेरील अमटूर–नयनगर जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख लक्ष्मी राजू माडमगेरी (३१), रा. गोल्लर गल्ली, बैलहोंगल अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी महिलेवर दगडाने जीवघेणा हल्ला करून …

Read More »