Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

शारदा विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

  बेळगाव : शहापूर गणेशपूर गल्ली येथील शारदा विद्यालयात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे …

Read More »

शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरण : डॉली धनंजयसह तीन कलाकारांना सीआयडी चौकशीची शक्यता

  बेळगाव : शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना, आता कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनाही सीआयडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. तपासाच्या अनुषंगाने काही कलाकारांना नोटीस बजावण्याची तयारी सीआयडीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉली धनंजय, वसिष्ठ सिम्हा तसेच अभिनेत्री रागिणी द्विवेदी …

Read More »

प्रेमळ व कणखर माता – कै. मोनाका गोरल

  एक सत्वशील, सोशिक, प्रेमळ व कणखर अशा स्वभावाच्या मोनाका महादेव गोरल यांचे गुरुवार( ता. 28) रोजी अकस्मिक निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी दिवस कार्यविधी होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे.. माणसाच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी दिसायला साधी सोपी असली तरी त्यांच्या अंतकरणातील कणखरता आणि करुणेची खोल ऊब सर्व …

Read More »

उघड्या विद्युत केबिनेटमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका

  बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक स्ट्रीट लाईट खांबांवरील विद्युत केबिनेटची झाकणे तुटलेली किंवा गायब असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष आर. दरेकर यांनी या धोकादायक परिस्थितीकडे राज्य शासन, हेस्कॉम आणि स्मार्ट सिटी प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरेकर यांनी …

Read More »

पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

  धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी …

Read More »

शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक

  ४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप बेळगाव : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने बेळगावस्थित शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. या उपक्रमात फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग, युवक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन …

Read More »

भाऊबंदकीच्या जमीन वादातील मारहाण प्रकरणात पाच जणांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या कथित मारहाण प्रकरणात दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी लक्ष्मी यशवंत बुरुड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती यशवंत बुरुड तसेच राजाराम व यल्लाप्पा बुरुड यांच्यात शेती आणि घराच्या वाटणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. …

Read More »

सहकार क्षेत्रासमोर मोठी आव्हाने; कर्मचारी व संचालकांनी सहकाराची तत्त्वे समजून काम करावे : प्राचार्य आनंद मेणसे

  बेळगाव : “या देशातील गोरगरीब आणि सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा करणे, हा सहकार क्षेत्राचा आत्मा आहे. पण सहकार क्षेत्रासमोर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरची अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे” असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी बोलताना केले. अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या …

Read More »

व्हॅक्सिन डेपोमध्ये स्वच्छता मोहीम जारी

  बेळगाव : व्हॅक्सीन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या समर्थ भारत प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी या रविवारीही सकाळी वॅक्सीन डेपो परिसर स्वच्छ केला. दोनच दिवसांपूर्वी साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला. मागच्या रविवारी त्या …

Read More »