बेळगाव : शहापूर येथील बसवण गल्ली परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला, निमित्त होते श्री महालक्ष्मी देवीच्या ११४ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे. धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले. जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारांनी वातावरण …
Read More »धर्मस्थळाविरुद्ध कारस्थान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; प्रमोद मुतालिक यांची टीका
बेळगाव : धर्मस्थळ क्षेत्र आणि हिंदू धर्माविरुद्ध पद्धतशीर कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी अभिनेते प्रकाश राज आणि प्राध्यापक भगवान यांच्यावर तीव्र टीका केली. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी धर्मस्थळ …
Read More »बेळगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम; जुगार आणि अंमली पदार्थ प्रकरणात चौघांना अटक
बेळगाव : शहरात बेकायदेशीर जुगार आणि अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत तीन वेगवेगळ्या कारवायांद्वारे चौघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने केएसआरपी दुसऱ्या बटालियनजवळ छापा …
Read More »विमा रकमेसाठी पत्नीचा कट; प्रियकराच्या मदतीने माजी सैनिकाची विष देऊन हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्याच्या दिशेने पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी आणि सुमारे दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हुक्केरी तालुक्यातील गोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी …
Read More »सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या बेळगाव चॅप्टरचे उद्घाटन; उद्योजकांसाठी नवे व्यासपीठ
बेळगाव : मराठी उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) च्या बेळगाव चॅप्टरचे उद्घाटन टिळकवाडी येथील ट्रीहाऊस हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या चॅप्टरमुळे बेळगाव आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिक तसेच नवउद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. …
Read More »एक लाखांच्या पुरस्काराचे ‘ज्ञानवृक्षात’ रूपांतर!
रणजीत चौगुले सरांचा अनोखा उपक्रम; व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत बेळगाव : काही पुरस्कार भिंतीवर लटकतात, काही कपाटात धूळ खात पडून राहतात; पण काही पुरस्कार समाजासाठी प्रेरणेचा दीप बनतात. सरकारी सरदार्स हायस्कूलचे सहशिक्षक रणजीत चौगुले यांनी मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे असेच एका सतत फळ देणाऱ्या ‘ज्ञानवृक्षात’ रूपांतर केले आहे. …
Read More »खाण व क्रशर उद्योगावर कोट्यवधींच्या दंडाचे संकट; नियम 44 अ मागे घेण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून खाण भाडेधारक आणि दगड क्रशर मालकांवर प्रस्तावित करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमुळे राज्यातील खाण आणि क्रशर उद्योग संकटात सापडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो उद्योजक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून अनेक खाणी आणि क्रशर युनिट्स बंद पडू शकतात, असा दावा कर्नाटक खाण व दगड …
Read More »जागतिक रक्तदान दिनानिमित्त वडगाव येथे रविवार, १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर
बेळगाव : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ (सोनार गल्ली, दत्त गल्ली, पटवर्धन लेआऊट, मा. वडगाव, बेळगाव) यांच्यावतीने रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संकलित केले जाणारे रक्त ‘श्री महावीर ब्लड बँक, बेळगाव’ यांच्यातर्फे संकलित (रक्त संकलन) …
Read More »सीमावासियांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका खूप खूप सोसलं… आता आमच्या आंदोलनाला समर्थ साथ द्या!
“माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया कायली…” या मराठी भावगीताच्या ओळी आजही सीमा भागातील प्रत्येक मराठी बांधवाच्या वेदना व्यक्त करतात. महाराष्ट्रापासून तुटले गेल्याची सल, न्यायासाठीचा सात दशकांचा संघर्ष आणि आपल्या मातृभूमीत सामावून घेण्याची आस आजही तितकीच तीव्र आहे. रामाचा वनवास चौदा वर्षांनी संपला; मात्र बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचा …
Read More »मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी मजगावमध्ये जनजागृतीची हाक; विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
बेळगाव : जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढता कल पाहायला मिळत असताना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी शाळांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी मजगाव येथील मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. ३५ च्या वतीने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta