बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शनिवारी बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवीन जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. अनेकदा निवेदन …
Read More »पीक नुकसानीची भाजप नेत्यांनी केली पाहणी
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी भागात मुसळधार पावसामुळे गाजर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. “पिकांच्या नुकसानीमुळे आम्ही मोठ्या अडचणीत आहोत, मात्र आमची व्यथा ऐकण्यासाठी मंत्री किंवा …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरात सीमोल्लंघन उत्साहात संपन्न
बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरमध्ये दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. आज सायंकाळी वडगाव, जुने बेळगाव व अनगोळ भागातून आलेल्या पालख्यांचे व हजारो भक्तांचे स्वागत मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकारी यांनी केले. उशिरापर्यंत परिसरातील नागरिकांनी सीमोल्लंघनाचा आनंद लुटला.
Read More »वडगावमध्ये भटकी व पाळीव कुत्र्यांना रेबीज लसिकरण
बेळगाव : वडगाव पशुचिकित्सालयातर्फे सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व कुत्र्यांना रेबिजचे लसिकरण करुन जनतेला भयापासून मुक्त करा असा आदेश आल्याने आज गुरुवार दि. 2/10/2025 रोजी सकाळी मनपा कर्मचारी तसेच वडगाव पशुचिकित्सालयाचे मुख्य डॉक्टर कट्याण्णावर तसेच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने वडगावमध्ये फिरणाऱ्या भटकी कुत्री तसेच घरी पाळलेल्या कुत्र्यांना रेबिज लसिकरण करण्यात आले. यामुळे …
Read More »दोनशे वर्षांची परंपरा लाभलेला शहापूरचा श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिभावात
बेळगाव : विजयादशमी निमित्त बेळगाव आणि शहापूरच्या दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते. वेंकट रमण गोविंदा, गोविंदा असा जयघोष करत भक्त रथ ओढत होते. रथाच्या मार्गांवर सडे घालून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सुहासिनी रथाला आरती करत …
Read More »मराठी विद्यानिकेतनतर्फे गांधी जयंती निमित्त पूरग्रस्तानसाठी मदतीचे आवाहन
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने महाराष्ट्र-कर्नाटक तसेच भारतभरात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांची शेते, घरे पाण्याखाली बुडाली आहेत. यामध्ये प्रचंड असे नुकसान झाले आहे. या भीषण पुरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना …
Read More »बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
बेळगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव यांच्याविरुद्ध बेळगाव पोलीस आयुक्तांकडे बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेस यांच्यावतीने युवा नेता मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली. बेळगाव पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी तक्रार स्वीकारली. यावेळी उचगांव ब्लॉक युवा …
Read More »‘बेधडक शक्तीस्वरूप 2025’ उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : बेधडक बेळगाव आयोजित ‘बेधडक शक्तीस्वरूप 2025 उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. विविध मंडळांनी साकारलेल्या कलात्मक व भक्तिभावपूर्ण देवीमूर्तींपैकी सर्वोत्तम मूर्तींना पारितोषिके जाहीर करण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे : 🥇 प्रथम क्रमांक – बेळगावची मानाची आई भवानी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, STM समर्थ नगर, बेळगाव 🥈 …
Read More »वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात चापगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीला आपल्या गावी येऊन परत इचलकरंजीला आपल्या कामावर हजर होण्यासाठी जात असताना आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास वंटमुरी घाटात त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, …
Read More »बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान पाहणी केली
बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान (मराठी विद्यानिकेतन) पाहणी केली व येणाऱ्या 02 ऑक्टोबर 2025 विजयादशमी दिवसाच्या नियोजनाबद्दल माहिती घेतली आणि सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta