Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने उद्या कल्याणोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने २५ जून २०२३ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी आठ वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून क्लब रोड, विश्वेश्वरय्यानगर येथून सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच …

Read More »

बेळगावात पावसासाठी मुस्लिम समुदायाची प्रार्थना

  बेळगाव : पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बेळगाव येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेदरम्यान …

Read More »

घटप्रभा नदीतील अनेक मासे मृत्युमुखी!

  बेळगाव : यावर्षी मान्सून लांबल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ जलचर प्राण्यांना देखील बसली आहे. नदी, नाले कोरडे पडल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदी …

Read More »

दानशूरांमुळे कॅन्सरग्रस्त बालकावर यशस्वी उपचार

  बेळगाव : जनतेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे एका गरीब दुर्बल घटकातील 6 वर्षाच्या बालकाच्या कॅन्सर उपचारासाठी मदत झाली असून तो मुलगा हळूहळू बरा होत आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गोकाक येथील 6 वर्षीय भर्माप्पा गौडा या बालकाला कॅन्सरने (ॲक्युट लिंफोब्लास्टिक लुकेमिया) ग्रासले होते. मात्र घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने …

Read More »

बेळगाव शहरासह विविध उपनगरांतील आणि काही गावांचा उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी (ता. 25 जून) विविध उपनगरांसह काही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळरोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाउंड, सर्वोदय कॉलनी, नाझर …

Read More »

महिलांना बस प्रवास करत आहात मग सावधान; पोलिसांचे आवाहन

  बेळगाव : राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरू केला आहे. सर्वच बसमध्ये महिलांची झुंबड उडत आहे.गर्दीचा फायदा घेत महिलांच्या सोन्या चांदीचे दागिने, पैसे पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांनी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन प्रत्येक बस मध्ये जाऊन करत …

Read More »

सरसकट दोनशे युनिट मोफत वीज नाही; हेस्कॉमचे स्पष्टीकरण

  बेळगाव : राज्य शासनाच्या गृहज्योति योजनेतून 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिले जाणार असली तरी प्रत्येक कुटुंबाची गेल्या वर्षभरातील वीज वापराची सरासरी काढली जाणार आहे. त्या सरासरीपेक्षा दहा टक्के अतिरिक्त युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबं सरसकट 200 युनिट वीज मोफत मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. …

Read More »

मनपा आयुक्तपदी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती

  बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्त पदी केएएस अधिकारी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अधीन कार्यदर्शिनी शुक्रवारी हा नियुक्तीचा आदेश बजावला आहे. अशोक धुडगुंटी यांनी या अगोदर निवासी जिल्हाधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावली …

Read More »

भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात येणार नवा पाहुणा

  बेळगाव : भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या लवकरच चारवर पोहोचणार आहे. सध्या संग्रहालयात 3 वाघ असून आणखी एक वाघीण राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून येथील संग्रहालयासाठी मंजूर झाली आहेत. या तिन्ही वाघांच्या सोबतीला पुढील आठवडाभरात बन्नेरघट्टा प्राणी संग्रहालयातून वाघीण भूतरामट्टीत दाखल होणार आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस …

Read More »

येळ्ळूर सीआरसी केंद्रात निवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला कुंभार यांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे …

Read More »