बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन 18 नोव्हेंबर रोजी
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 23 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रथमतः प्रबोधनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. बैठकीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत निषेध …
Read More »खेळाडूच्या स्वप्नपूर्तीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलची लाभली साथ
बेळगाव : सेवानिवृत्त शिक्षक श्री. वाय.पी. नाईक यांना बेळगाव जवळील बहाद्दरवाडी गावातील खेळाडूचा फोन आला. खेळात सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. लागलीच श्री. वाय. पी. नाईक यांनी त्यांचे मित्र श्री. संतोष दरेकर यांना फोन केला आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष यांनी रियाला मदत करण्यासाठी त्याच्या मित्रांना …
Read More »कित्तूर उत्सवाच्या ज्योती यात्रेचा शुभारंभ
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने चन्नम्मा कित्तूर उत्सव 2023 चा भाग म्हणून विधान सौधासमोर आयोजित केलेल्या ज्योती यात्रेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चन्नम्माच्या कित्तूर महोत्सवाच्या ज्योती यात्रेचे उद्घाटन केले. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या वीर नारी कित्तूर राणी चन्नम्मा …
Read More »बेळगावात बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई; गणेशपूर येथे ९ लाखांचे फटाके जप्त
बेळगाव : कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील अत्तीबेले येथे गोदामात फटाके उतरविताना घडलेल्या आग दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगावतही पोलिसांनी बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. गणेशपूर येथे ९ लाखांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. गणेशपूर येथील व्यापाऱ्याने मागवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांचे ३१ बॉक्स …
Read More »बहाद्दरवाडीची रिया पाटील हिला विविध भागातून सहकार्य
किणये : बहाद्दरवाडी गावची रिया कृष्णा पाटील हिने मंगळूर येथे झालेल्या राज्य पातळीवरील भालाफेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. तिची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. आज दि. १३ रोजी ती राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यामुळे तिला विविध भागातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. रिया पाटील हिच्या …
Read More »चक्क आरोग्य खात्याच्या कार्यालयातच ओली पार्टी
बेळगाव : जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयात गांधी जयंतीदिनी ओली पार्टी करणाऱ्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी याप्रकरणी सात कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा आदेश बुधवारी बजावला आहे. जिल्हा आरोग्याधिकारी यांचे वाहनचालक मंजुनाथ पाटील यांच्यासह महेश हिरेमठ, रमेश नाईक, सत्यप्पा तम्मण्णवार, अनिल तिप्पण्णावर, दीपक …
Read More »बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार
बेळगाव : बेळगाव महापालिकेने नियमानुसार मालमत्ता कर 2021-22 सालापासून वाढलेला नाही. मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय झाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याचा ठपका ठेवून महापालिका प्रशासन संचनालयाने (डी एम ए) बेळगाव महापालिकेला पालिका बरखास्त का करू नये यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरसेवक-नगरसेविका तसेच पालिका वर्तुळात एकच …
Read More »….म्हणे काळ्यादिनाला परवानगी नाही
बेळगाव : भाषावार प्रांतरचना होऊन मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनाला परवानगी देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे. कन्नड संघटनांनी त्याचे स्वागत केले असले तरी यातून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाल्याची भावना मराठी भाषिकांच्या पसरली आहे. बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात …
Read More »एसडीपीआय बेळगाव शाखेतर्फे मोर्चाने निवेदन सादर
बेळगाव : राज्य सरकारने कांतराज आयोगाचा अहवाल स्वीकारून तो सर्वसामान्यांसाठी लागू करावा. तसेच मुस्लिम समुदायासाठी 2 -बी राखीवता अंमलात आणून ती शेकडा 8 टक्के इतकी वाढवावी, या मागणीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे आज गुरुवारी सकाळी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta