Thursday , September 19 2024
Breaking News

बेळगाव

जायंट्स ग्रुपतर्फे 1 जुलैला डॉक्टर्सचा सन्मान

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर्स डे दिवशी म्हणजे एक जुलै रोजी शहरातील सेवाभावी कार्य केलेल्या 6 डॉक्टर्सचा सन्मान केला जाणार आहे. त्यामध्ये डॉ. विनायक रमेश भोसले, डॉ. अनिल संतीबस्तवाड, डॉ. सुरेश नेगिनहाळ, डॉ आप्पासाहेब कोने, डॉ. हेमंत भोईटे व डॉ. मनोज तोगले …

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी म. ए. समितीच्यावतीने पत्र!

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात तातडीने लक्ष देऊन सीमाभागातील विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेत स्थान देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा समन्वयक मंत्री श्री. शंभूराजे देसाई यांना पत्र धाडले आहे. सीमा प्रदेशातील अनेक युवक व युवतींनी महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अर्ज …

Read More »

बेळगाव-पुणे-बेळगाव वंदे भारतसह प्रलंबित रेल्वे प्रकल्पांची पुर्तता करा : खास. जगदीश शेट्टर

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथील शपथविधी संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे प्रकल्पाच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगावमधील प्रलंबित रेल्वे प्रकल्प लवकरात लवकरपूर्ण करून नव्या मागण्याचीही पूर्तता करून देण्यासाठी विनंती करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत बेळगाव …

Read More »

विनयभंगाच्या खोट्या आरोप प्रकरणी १३ जण दोषी

  बेळगाव : हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांच्यावर खोट्या विनयभंगाचवगुन्हा दाखल करणाऱ्या १३ जणांना मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विनयभंगाची तक्रारदार बी. व्ही. सिंधू सह १३ जणांना ३ वर्षे सहा महिने तुरुंगवास आणि प्रत्येकी ८६,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बी.व्ही. सिंधू …

Read More »

डाॅ. राजश्री अनगोळ यांना राज्यस्तरीय ‘डॉक्टर्स डे’ पुरस्कार

  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कर्नाटक राज्य शाखेने बेळगावच्या डाॅ. राजश्री आर. अनगोळ यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल यंदाचा राज्यस्तरीय ‘आयएमए कर्नाटक राज्य शाखा डाॅक्टर्स डे पुरस्कार -2024’ जाहीर केला आहे. बेंगलोर येथील बसव राजेंद्र ऑडिटोरियम, बीएमसी ॲल्युमनी असोसिएशन बिल्डिंग, बेंगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पस के. आर. रोड …

Read More »

विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन शनिवारी

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलनाचे शनिवार ता. 29 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षातमानंदजी महाराज, राष्ट्रसेविका समितीच्या अलकाताई इनामदार, रामचंद्र एडके, विद्याभारती …

Read More »

अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत बाइक रॅलीद्वारे जनजगृती

  बेळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा पोलीस व चिक्कोडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या दुचाकी चालवून अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. यावेळी …

Read More »

विद्यार्थ्यांना मोफत बसमध्ये जागा द्या; अभाविपच्यावतीने आंदोलन

  बेळगाव : विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा न दिल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी यावे व दिलेले आश्वासन पूर्ण करावे व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी घोषणाबाजी करण्यात …

Read More »

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवा पिढीचे भविष्य धोक्यात : पी. व्ही. स्नेहा

  बेळगाव : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचा एक भाग म्हणून विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे अंमली पदार्थांचा वापर आणि सेवना विरुद्ध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, अंमली पदार्थांच्या वापराचे त्यांच्या …

Read More »

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा संपन्न

  बेळगाव : दिनांक २६ जून २०२४ रोजी बेळगांवातील सदाशिव नगर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या शुभदिनी शाहु भवन व बेळगाव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासाठी अनिल बेनके यांच्याकडून विशेष सभा घेण्यात आली. यावेळी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात …

Read More »