Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

अशोक चव्हाण, बंटी पाटील समितीच्या रडारवर!

  बेळगाव : महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते आज बेळगावमध्ये आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असून समिती उमेदवारांच्या विरोधार्थ ते प्रचारात उतरले आहेत. यामुळे संतापलेल्या समिती कार्यकर्त्यांकडून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिळकचौक येथे जाहीर प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. यावेळीही समिती कार्यकर्त्यांनी …

Read More »

समितीचे उमेदवार निवडून देण्याचा मराठी वकील संघटनेचा निर्धार; समितीच्या पाचही उमेदवारांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. ॲड. अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषेत वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल टपालवाले हे होते. यावेळी वकील संघटनेचे जेष्ठ वकील ॲड. नागेश सातेरी यांच्या हस्ते बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर …

Read More »

म. ए. समिती विरोधात प्रचार केल्याचं फडणवीसांकडून समर्थन

  बेळगाव : माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरिता मी बेळगावला आलो आहे, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करणं सोडलं तर मी येथे येणार नाही असे सांगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात म. ए. समितीच्या विरोधात भाजपचा प्रचार केल्याचं समर्थन केलं. बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस …

Read More »

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 ते 8 मे प्रचार दौऱ्यावर

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेते बेळगाव आणि सीमा भागात येऊन आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विक्रम समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला आहे. त्यानंतर आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी बेळगावात भारतीय जनता …

Read More »

घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार विकू नका : प्रा. मधुरा गुरव

  गोजगा : श्रीमंत गरीब स्त्री पुरुष या सर्वांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदान प्रक्रियेतून आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी निवडायची संधी दिलेली आहे या संधीचा उपयोग आपली शेती जमीन, आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी स्वाभिमान जतन करण्यासाठी करूया. गेली पंधरा वर्षे आमच्या या ग्रामीण मतदारसंघात पैसे आणि …

Read More »

ग्रामीण मतदार संघामध्ये म. ए. समितीचा भगवा फडकणार

  माजी ग्रा. पं. सदस्य सुभाष मरुचे उचगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये यावेळी म. ए समितीची सत्ता येणार असून कर्नाटक विधानसभेत समितीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय ग्रामीण मतदारसंघातील जनता स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन सुळगा (हिं) ग्राम पंचायतचे माजी सदस्य सुभाष मरुचे यांनी व्यक्त केले. कल्लेहोळ गावामध्ये म ए समितीचे ग्रामीणचे …

Read More »

पंतबाळेकुंद्रीत आजपासून श्रीपंत विवाह सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव :अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्रीत श्रीपंत महाराज व सौ. यमुनाक्का यांच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून ४ ते ६ मे २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार ४ ते ६ मे या कालावधीत दररोज सकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत प्रातस्मरण सद्गुरूचे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांविरोधात म. ए. समिती नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असताना देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाल्यामुळं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. यावेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र …

Read More »

अनगोळ, भाग्यनगर भागात रमाकांत कोंडुसकरांना वाढता पाठिंबा

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर अनगोळ, भाग्यनगर या विभागात आणि पदयात्रा बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी सात वाजता अनागोळ नाक्यावरून प्रचार फेरी आणि पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. अनगोळ नाकावरील स्वयंभू गणेश मंदिर येथे पूजा करून प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, …

Read More »

भाजपला फायदा होईल अशी कृती ‘राष्ट्रवादी’ने करू नये : पृथ्वीराज चव्हाण

बेळगाव : प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे; मात्र कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून किंवा इतरांचा प्रचार करून राष्ट्रवादीने भाजपला फायदा होईल, अशी कृती करू नये, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. कर्नाटकात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यात येत …

Read More »