Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

ज्येष्ठ सीमा सत्याग्रही काॅ. कृष्णा मेणसे यांचे कोंडुसकरना आशीर्वाद

  बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सोमवारी सकाळी सरस्वतीनगर …

Read More »

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश

  नवी दिल्ली : कर्नाटक राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षणोक्षणी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या पाठोपाठ, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काल भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर शेट्टर यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शेट्टर यांना हुबळी-धारवाड सेंट्रल मधून उमेदवारी …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा झंझावाती शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज उचगाव येथील श्री मळेकरणी देवस्थानात पूजन करून प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री मळेकरणी देवस्थानात पूजन …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या वननेस प्राईड येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि समितीला विजयी करण्याचा निर्धार करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. ऍड. …

Read More »

२७ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक!

  बेळगाव : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. शिवजयंती उत्सव दि. २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची तातडीची बैठक आज

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे चार वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव शिवजयंती उत्सव २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत त्यावर विचार विनिमय करून मिरवणुकीची तारीख ठरविण्यासाठी बेळगाव शहर तसेच शहापूर भागातील …

Read More »

ट्रान्समिशन टॉवर लाईनखाली आलं भरघोस पिकं

  बेळगाव : ट्रान्समिशन टॉवर लाईन खाली पीक येत नाही असे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची तोंडे टॉवर लाईन खाली आलेली पिके पाहून बंद झाली आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यानी शिवारातील भात कापणी केली आणि शेतकऱ्यांना समाधारक भात पीक मिळाले., इतकेच नाही तर भाजी पीकही बऱ्यापैकी आल्याचे शेतकऱ्यांतुन सांगण्यात आले आहे..ग्रीन …

Read More »

हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

  बेळगाव (प्रतिनिधी) : हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह बेळगावने जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे असून हॉकीसाठी असलेली ही ख्याती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांनी केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी युवक युवतींना पुढे यावे असे आवाहन उद्यमबाग पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार यांनी केले. ते हॉकी बेळगाव …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले हे रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक आठ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर बेळगाव तालुक्याचे ग्रामदैवत असलेले उचगांव येथील …

Read More »

दक्षिणमधून रमाकांत दादा कोंडुस्कर समितीचे अधिकृत उमेदवार

  बेळगाव : दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 87 सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली …

Read More »