Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

तुकाराम बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बेळगाव : शहापूर येथील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे हे होते. उपस्थित भागधारकांचे स्वागत संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी केले. बँकेचे कर्मचारी कै. सुनील पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बँकेचे जे सभासद, ठेवीदार व …

Read More »

आपले ज्ञान वृद्धिंगत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य : प्रा. आनंद मेणसे

मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न बेळगाव : मी शिक्षक आहे म्हणजे इतरांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे ही भावना शिक्षकांच्यात निर्माण झाली पाहिजे, शिक्षक असल्याची जबाबदारी घेतल्यानंतर त्या विषयाची बांधीलकी मानून त्याविषयीचे आपले ज्ञान वृद्धिंगत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय व वनिता …

Read More »

जुने बेळगाव येथील अनधिकृत दारू दुकाने बंद करण्याची मागणी : नागरिकांनी छेडले आंदोलन

बेळगाव : जुने बेळगाव नाका व बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत तसेच चोरट्या मार्गाने सुरू असलेली गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी जुने बेळगाव येथील समस्त नागरिक आणि महिलावर्गाने मोर्चाने केली आहे. जुने बेळगाव येथील नागरिक व महिलांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा …

Read More »

भीमाप्पा गडाद यांचा बेळगावच्या माजी तहसीलदारांवर आरोप

बेळगाव : गेल्या कांही महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक खर्चासाठी असलेल्या 8 कोटी 69 लाख 80 हजार रुपये इतक्या सरकारी निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याला जबाबदार दांडेली आणि बेळगावच्या तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी मुडलगीचे आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी केली आहे. आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी …

Read More »

पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो : प्रा. विनोद गायकवाड

बाल-शिवाजी वाचनालयाचा 48 वा वर्धापन दिन साजरा बेळगाव : ‘वाचल्यामुळे ज्ञान वाढते तर न वाचल्यामुळे अज्ञान वाढते. चांगली पुस्तके ही आपली गुरू आहेत. पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो. मच्छे गावात अनंत लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 वर्षांपूर्वी ज्या वाचनालयाचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.’ असे विचार राणी चन्नम्मा …

Read More »

पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यतत्परतेमुळे अनर्थ टळला

बेळगाव : बेळगाव जाधवनगर येथील एनसीसी मुख्यालयासमोर एक विद्युत खांबाला जोडलेली विद्युतभारित वायर तुटून पडली होती. हा प्रकार लक्षात येताच कॅम्प पोलीस स्थानकाचे अधिकारी विनोद महालमनी यांनी लागलीच हेस्कॉम अधिकार्‍यांना याची कल्पना दिली. हेस्कॉमने तातडीने दाखल होत त्या तुटलेल्या वायरचा भाग पुन्हा जोडला असून अनर्थ टाळला गेला आहे. एक जर्मन …

Read More »

बुद्धिबळपटूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ महोत्सवात गोल्डन चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. आठ वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात गीतेश सागेकर याने दुसरा क्रमांक तर सुयश उडकेरी याने तिसरा क्रमांक पटकाविला. दहा वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या विभागात अनिरुद्ध दासरी याने पहिला तर गितेश सागेकर याने दुसरा क्रमांक …

Read More »

हिवाळी अधिवेशन होणारच, सर्व तयारी पूर्ण : पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : आगामी 13 डिसेंबरपासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे. बेळगावला येणार्‍या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे अधिवेशनाबाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी बेळगावात भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा तालुका म. ए. समितीचा निर्धार

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजनासंदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार …

Read More »

अधिवेशनच्या पहिल्या दिवशी समितीचा महामेळावा

बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय …

Read More »