Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या कबड्डी व थ्रोबॉल संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  मच्छे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर झालेल्या मुलांच्या कबड्डी व थ्रोबॉल स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. निर्मळ नगर येथे झालेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात मन्नीकेरी हायस्कूलचा पराभव करत मुलांच्या थ्रोबॉल संघाने तसेच कबड्डी खेळातील अंतिम सामन्यात …

Read More »

हिंदी भाषा भारतीय संस्कृतीचे हृदयस्पंदन : डॉ. प्रो. सिताराम के. पवार

  बेळगाव : हिंदी भाषेला प्राचीन इतिहास आहे. हिंदी भाषेला निश्चितच एक प्राचीन इतिहास आहे, जो संस्कृत भाषेच्या मुळाशी जोडलेला आहे आणि साधारणपणे एक हजार वर्षांहून अधिक जुना आहे. संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधून विकसित होऊन हिंदी भाषेचा पाया घातला गेला. हिंदी आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे, असे प्रतिपादन …

Read More »

प्रगती मल्टीपर्पज सोसायटीला 10 लाख 61 हजार रुपये नफा

  बेळगाव : महात्मा फुले रोड शहापूर बेळगाव येथील प्रगती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित या सोसायटीची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन अजित पाटील होते. प्रारंभी सोसायटीचे चेअरमन अजित पाटील, व्हा. चेअरमन परशुराम रायबागी व संचालक मंडळांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. …

Read More »

दसरा, श्री दुर्गा माता उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पोलिसांची बैठक

  बेळगाव : आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलिस स्थानकात दसरा व दुर्गामाता उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार उपविभागाचे एसएससी शेखरप्पा हे होते. या बैठकीत कॅम्प, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली कांगली गल्ली आदी भागात होणाऱ्या श्री दुर्गामाता उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …

Read More »

“पंचमसाली प्रतिज्ञा क्रांती रॅली” 20 सप्टेंबरला : श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी

बेळगाव : लिंगायत पंचमसाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात रायबाग (जि. बेळगाव) तालुक्यातील हारुगेरी येथे येत्या शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता “पंचमसाली प्रतिज्ञा क्रांति रॅली” या शीर्षकाखाली लिंगायत पंचमसाली समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरु श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. बेळगाव शहरातील कन्नड …

Read More »

गांजा विक्री करणाऱ्याला 5 वर्षे सक्तमजुरी, 50 हजार दंड

बेळगाव : गांजा या अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या पद्धतीने 2008 नंतर एनडीपीएस प्रकरणी झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव समीर लट्टमनावर (वय 36, रा. धारवाड) असे आहे. सीईएन क्राइम …

Read More »

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी

  बेळगाव : बेळगाव येथील ‘जय किसान’ या खासगी बाजाराने आपले व्यवहार थांबवल्यामुळे, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरी मोठ्या संख्येने आपला शेतमाल घेऊन आल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली होती. बेळगावमधील ‘जय किसान’ या खासगी बाजाराचा परवाना रद्द झाल्याने शेतकरी आपला शेतमाल बुधवारपासून बेळगाव …

Read More »

धर्म -हिंदू, जात-मराठा, पोटजात- कुणबी व मातृभाषा-मराठी अशीच नोंद करावी : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : कर्नाटक सरकारकडून राज्यात जात जनगणना केली जाणार आहे. यामुळे गणतीवेळी मराठा समाजाने व्यवस्थितरीत्या माहिती देणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात ‘कुणबी’ असा उल्लेख केल्यास कोणताही गैरसमज होण्याचे कारण नाही. कोणत्याही निकषाची पर्वा न करता मराठा समाजाने या सर्वेक्षणाच्या फाॅर्म मध्ये धर्म-हिंदू, जात-मराठा, पोटजात- कुणबी व मातृभाषा-मराठी अशीच नोंद करावी …

Read More »

श्रमाची, स्वाभिमानाची व सहकार्याची अक्षरे गिरवली तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो : प्राध्यापिका डॉ. सरिता मोटराचे (गुरव)

  बेळगाव : निलजी येथील रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटी व रणझुंझार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व त्या निमित्ताने आयोजित केलेला सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा असा संयुक्त समारंभ रणझुंझार हायस्कूलच्या कै. अशोकराव मोदगेकर सभागृहात उत्साही वातावरणात नुकताच पार पडला. यावेळी हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. …

Read More »

चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती 31 डिसेंबर पूर्वी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे येत्या 31 डिसेंबरपूर्वी विभाजन करून स्वतंत्र अशा चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव येथे पोषण अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिला आणि …

Read More »