बेळगाव : राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांनी सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आंदोलन केले. बेळगावातील खासगी जय किसान मार्केटमधील 300 दुकानांचे व्यापारी आणि कामगार ए.पी.एम.सी. परवानगी रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी ‘ट्रेडिंग लायसन्स’ (व्यापार …
Read More »ईद – मिलाद मिरवणुकीतील उर्दू-इंग्रजी बॅनरवरून करवेचा महापालिकेत धुडगूस
बेळगाव : बेळगावमध्ये सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत असताना जाणीवपूर्वक सीमाभागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. नुकताच झालेल्या गणेशोत्सव व ईद-मिलादच्या काळात शुभेच्छा फलकांवर मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत करवेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन धुडगूस घातली असून त्यांच्या या कृत्याने बेळगाव …
Read More »अशोक नगर जलतरण तलाव जनतेसाठी सज्ज; उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांच्या हस्ते उद्या उद्घाटन!
बेळगाव : अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्टॅंडर्डच्या 50×25, 10 लेनच्या जलतरण तलावाचे रीतसर उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी साडेअकरा वाजता उतरचे आमदार श्री. असिफ उर्फ राजू शेठ यांच्या हस्ते होणार असून यावेळी बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार, उपमहापौर सौ. वाणी जोशी, महापालिका आयुक्त शुभा बी., डेप्युटी …
Read More »एपीएमसी मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला अथवा अन्य कृषी उत्पादनांची विक्री करावी
एपीएमसी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन बेळगाव : बेळगाव शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटचा व्यापारी परवाना रद्द करण्याची कारणे स्पष्ट करून शेतकरी बांधवांनी यापुढे आपली कृषी उत्पादने कंग्राळी रस्त्यावरील बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मार्केट यार्ड मध्ये विक्रीसाठी आणावीत, असे आवाहन एपीएमसीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे …
Read More »मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सेंट पॉल्स “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन”
डिवाइन प्रॉव्हिडन्स महिला गटात विजेते बेळगाव : नुकत्याच गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मराठा युवक संघाच्या विसाव्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 78 गुण मिळवून सेंटपॉल्स स्कूलने “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन” हा किताब पटकाविला तर मुलींच्या गटामधील चॅम्पियनशिप 69 …
Read More »जनगणना सर्वेक्षणात सर्व मराठ्यांनी धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी”, मातृभाषा “मराठी” अशी नोंद करावी : डॉ. सोनाली सरनोबत यांचे आवाहन
बेळगाव : नुकताच बेंगळूर येथे माजी मंत्री पी. जी. आर. सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. आगामी कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोग व शैक्षणिक सर्वेक्षण याच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. कर्नाटक क्षत्रिय राज्याध्यक्ष श्री. सुरेशराव साठे यांच्या नियोजनात सदर बैठक झाली. यावेळी जगद्गुरु श्री मंजुनाथ भारती …
Read More »कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला प्रारंभ; कटबंध वाराची सुरुवात
बेळगाव : कंग्राळी बुद्रुक (ता. बेळगाव) येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. 28 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक वैभवात होणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने 16 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कटबंध वार पाळण्यात आला. सकाळी देवीची पूजाअर्चा आणि गदगेवरील पावलांचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. पहिल्या वारानिमित्त …
Read More »जनगणना सर्वेक्षणात मराठा बांधवांनी “मराठा कुणबी” नोंद करावी : एम. जी. मुळे
बेळगाव : येत्या 22 सप्टेंबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत कर्नाटक राज्यामध्ये मागासवर्गीय आयोगातर्फे जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने सहभागी होऊन नमुना फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये “हिंदू”, जातीच्या कॉलममध्ये “मराठा”, पोटजातीच्या कॉलममध्ये “कुणबी” तसेच मातृभाषेच्या कॉलममध्ये “मराठी” …
Read More »पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली मुलांच्या तब्येतीची विचारपूस
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील मोरारजी देसाई निवासी शाळेत मंगळवारी नाश्ता केल्यानंतर पोटदुखी आणि उलट्या झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १६ मुलांची पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. उपचार घेत असलेल्या मुलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात अचानक भेट …
Read More »केडीपी बैठकीत शिक्षकांच्या समस्यांवरून गदारोळ; आमदार राजू कागे संतप्त
बेळगाव : आज बेळगावमध्ये केडीपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरकारी शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षकांच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य उत्तर न मिळाल्यामुळे कागवाडचे आमदार राजू कागे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी आपल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta