Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

बेळगावात 28 ऑगस्टपासून गणेश ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव – केजीबी स्पोर्ट्स आयोजित श्री गणेश ट्रॉफी 46 वे सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक एसपी ऑटो ॲक्सेसरीज यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. सलग 45 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून या स्पर्धेनंतर बेळगाव मधील क्रिकेट हंगामाला सुरुवात होते. यावर्षी सरदार हायस्कूल मैदानावर गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी …

Read More »

अथणी येथे ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोघे हेल्मेट घातलेले दरोडेखोर हातात बंदुक घेऊन शिरले. ज्वेलर्सचे मालक महेश पोतदार (२५) हे दुकानात होते. दुकानावर दरोडा घालण्यासाठी दोघे आल्याचे लक्षात येताच मालकाने आरडाओरड केली. यामुळे चोर …

Read More »

हॉकी बेळगाव व शासनातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

  बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या शारिरीक शिक्षण अधिकारी श्रीमती …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन

  बेळगाव : ‘जो विद्यार्थी मेहनत घेतो तो आयुष्यात यशस्वी होतो.’ असे उद्गार राऊंड टेबल क्लबचे सदस्य अक्षय ओडूगौडार स्मार्ट टीव्ही पॅनलच्या उद्घाटन समारंभा निमित्त बोलत होते. पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला राऊंड टेबल क्लबकडून 86 इंच स्मार्ट टीव्ही पॅनल देण्यात आला. त्या स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन राऊंड टेबल क्लबचे …

Read More »

पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांची बेळगावचा राजाच्या गणेशोत्सव मंडळाला भेट

  बेळगाव : पोलिस आयुक्त भुषण बोरसे यांनी नुकतीच बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली येथील श्रीच्या मंडपात मंडळाच्या प्रतिनिधींना भेट देऊन गणपती बाप्पाच्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान उत्सवाच्या सुरक्षित व सुरळीत आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणोशोत्सव महामंडळाची आज महत्वाची बैठक

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा प्रशासनाकडून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला आहे. सदर निर्णय घेताना बेळगाव महापालिकेला विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालून …

Read More »

बेळगावात ईद मिलाद-उन-नबी निमित्त शांतता समितीची बैठक

  बेळगाव : बेळगावमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद मिलाद-उन-नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सिरत समितीचे प्रतिनिधी, बेळगावातील सर्व जमात समित्यांचे सदस्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ही बैठक घेण्यात आली. …

Read More »

काकती गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; ग्रामस्थांची तीव्र मागणी

  बेळगाव :  काकती (ता. जि. बेळगाव) गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तरी सदर कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी काकती ग्रामपंचायतीसह समस्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. काकती ग्रामपंचायत अध्यक्ष व्ही. एल. मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर क्रीडा स्पर्धा; संत मीरा शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

  बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर स्वाध्याय विद्या मंदिर आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर अनगोळ, टिळकवाडी, शहापूर विभागाच्या प्राथमिक मुला -मुलींच्या अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 118 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर बालिका आदर्श शाळेने 116 गुणासह उपविजेतेपद पटकाविले मुलांच्या गटातील अथलेटिक …

Read More »

शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवा : युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्धा गंभीर झाला असून शहरात अवजड वाहनांना शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावच्या पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. ऑगस्ट २०२२ मध्ये कॅम्प येथे अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झालेल्या दुःखद घटनेनंतर, पोलीस प्रशासन …

Read More »