बेळगाव : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्वल करणाऱ्या मलप्रभा जाधव या खेळाडूचे अभिनंदन एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट यांच्यावतीने करण्यात आले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिला जाताना शुभेच्छा व सहकार्य करण्यात आले होते. तिने तजिकिस्तान येथील दुष्मानी मध्ये झालेल्या एशियन ग्रास चॅम्पियनशिप स्पर्धेत 48 किलो वजन गटात कांस्य पदक पटकाविले असून त्या स्पर्धेत …
Read More »कपिलेश्वर रोड शौर्य संघ ठरला श्रीमंगाईदेवी ट्रॉफीचा मानकरी
बेळगाव : कपिलेश्वर रोड शौर्य या संघाने मंगाईदेवी ट्रॉफी पटकाविली आहे. तर उपविजेता पिरनवाडीच्या सनसेट वॉरियर्स संघ ठरला. गेल्या पंधरा वर्षापासून वडगाव मंगाई देवी परिसरामध्ये श्री मंगाई ट्रॉफी या नावाने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. यावर्षीही अशाच पद्धतीने ही स्पर्धा उत्साहात पार पडली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »जपल्या जाताहेत संभाजीराजांच्या स्मृती!
बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री एकदंत युवक मंडळाच्या वार्ता फलकाजवळ बुधवारी रात्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी विधिवत पूजन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले. हा आपला पराक्रम इतिहास आहे. …
Read More »‘परीक्षा पे चर्चा’साठी बेळगावच्या केंद्रीय विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांची निवड
बेळगाव : विद्यार्थ्यांनी दडपण न घेता मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा‘ हा उपक्रम सुरु केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या या चर्चेत बेळगावच्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली हा अभिमानाचा विषय असल्याचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता परीक्षा …
Read More »पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर साप
बेळगाव : शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेश दारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. मात्र सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये एक साप शिरला …
Read More »बामणवाडी रस्त्याबाबत ‘शांताई’चे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन …
Read More »अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा
आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे …
Read More »टिप्परखाली सापडून ब्रम्हनगरचा युवक ठार
पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली ही घटना बेळगाव : भरधाव टिप्परखाली सापडून ब्रम्हनगर (बेळगाव)चा 35 वर्षीय इसम जागीच ठार झाला. विजय परशुराम नाईक असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता …
Read More »विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट
बेळगाव : बेळगावमधील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरमध्ये गोवा भाजप उत्तर विभाग अध्यक्ष सध्या उपचार घेत असून यांच्या तब्येतीची विचारपूस करून डॉ. रवी पाटील आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेतली. …
Read More »अनुसूचित जाती-जमाती अन्याय निवारणासाठी जिल्हा जागृती समितीची बैठक संपन्न
बेळगाव : अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांवर झालेल्या अन्यायावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येतील, तसेच त्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हा जागृती आणि प्रभारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta