Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणनिमित्त भजन संकीर्तन कार्यक्रम

  बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणानिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेणुका भजनी मंडळ,भाग्यनगरच्या भगिनींनी सुरेख आवाजात, टाळ मृदंगाच्या आणि हार्मोनियमच्या साथीने अनेक भजने सादर केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात हार्मोनियम वादक शंकर पाटील आणि तबला वादक प्रमोद पाटील यांचा मदन बामणे यांच्याहस्ते शाल भेटवस्तू देऊन सन्मान …

Read More »

गणेशचतुर्थी निमित्त पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची शहरात फेरी

  बेळगाव : गणपती विसर्जन मार्ग आणि इतर भागांतील समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते कपिलेश्वर तलावपर्यंत पोलिस आयुक्त भूषण बोरसे, बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जनसंपर्क सदस्य विकास कलघटगी, मनपाचे अधिकारी आणि हेस्कॉमचे अधिकारी यांनी पाहणी केली. शुक्रवारी …

Read More »

गांजा वाहतूक करणारे रॅकेट गजाआड; सीईएन पोलिसांची बेळगावात मोठी कारवाई

  सहा जणांना अटक ; ५० किलो गांजा जप्त बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं.) गावात हॉटेल जवळ एका कारची तपासणी केली असता सुमारे ५० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आज सांगितले. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटीची तरतूद : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील शक्तीची देवता असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. कर्नाटक पर्यटन व्यापार (सुविधा आणि नियमन) कायद्यावर आज विधान परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्रात देश-विदेशातून भाविक येतात, …

Read More »

ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर रविवारी

  बेळगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित …

Read More »

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेटचे वितरण; माधुरी जाधव फाउंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : वारा आणि पावसाची पर्वा न करता कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या मनपा सफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) यांनी आपल्या मातोश्री श्रीमती. वासंती रामा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच ब्लॅंकेटचे वितरण केले. बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू आहे. परिणामी वातावरणात प्रचंड गारठा निर्माण …

Read More »

बेळगावच्या राजाला चांदीचा मुकूट अर्पण….

  बेळगाव : सर्वांना आस लागलीये ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची… नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला आणि सीमाभागातील प्रसिद्ध अशा ‘बेळगावच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी चव्हाट गल्ली बेळगाव येथे करतात एवढंच काय तर मोठमोठे राजकीय व उद्योगपती देखील बेळगावच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. अशातच यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी …

Read More »

भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोडवर खड्ड्यात अडकून मिनी टेम्पो उलटला!

  बेळगाव : बेळगाव शहरात रस्त्यांची दुर्दशा झाली असून, भाजी मार्केटमध्ये भाज्या घेऊन जाणारा एक मिनी टेम्पो उलटून अपघात घडला. या अपघातात महिला व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले. शहरातील भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोडवर एका खड्ड्यात अडकून मिनी टेम्पो उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली …

Read More »

बेळगावमध्ये रिक्षा भाड्यावरून वाद, महिलांनी केली रिक्षाचालकाला मारहाण

  बेळगाव : बेळगावातील डॉ. आंबेडकर रोडवरील जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षाच्या भाड्यावरून प्रवासी महिला आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. मारहाण झालेल्या रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी कमी भाड्याबद्दल विचारले असता, महिलांनी शिवीगाळ केली. त्यांनी रिक्षाची चावी काढून घेतली आणि इतर …

Read More »

प्राथमिक हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

  बेळगांव : टिळकवाडी येथील वॅक्सिंग डेपो मैदानावर स्वाध्याय विद्या मंदिर शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टरच अनगोळ, शहापूर, टिळकवाडी मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला. प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 8-3 असा पराभव केला, विजयी …

Read More »