Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

मायक्रो फायनान्सच्या विरोधात बेळगावात शेतकरी संघटना आक्रमक

  बेळगाव : मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने फायनान्स कंपन्यांच्या छळामुळे तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी …

Read More »

तारांगण, साई प्रतिष्ठान व सुमन क्लिनिक यांच्या वतीने ६ वे कवयित्री संमेलन शनिवारी

  बेळगाव : तारांगण, साई प्रतिष्ठान व सुमन क्लिनिक यांच्या वतीने ६ वे कवयित्री संमेलन हळदी कुंकू समारंभ शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे. या कवयीत्री संमेलनाच्या निमित्ताने बेळगाव सीमा भागातील कवयित्रींना कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ …

Read More »

प्रशांत खन्नूकर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स मानकरी

  बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित 12 व्या सतीश शुगर क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल जिमच्या प्रशांत खन्नूकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स जिल्हास्तरीय किताबाचा मानकरी ठरला. पॉलिहैड्रानच्या व्यंकटेश ताशिलदारने पहिले उपविजेतेपद तर लाईफ टाईम जिमच्या विशाल …

Read More »

बेळगाव शहरात ठराविक वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  बेळगाव : वाढते अपघात व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बेळगावात ठरावीक वेळेपुरता अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शहरात रोज सकाळी 7 ते 11 व दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. काँग्रेस रोड …

Read More »

वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांना मालवांचल विद्यापीठाची डॉक्टरेट

  बेळगाव : कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा येथील प्राध्यापिका वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी “कर्नाटकातील निवडक रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये आढळलेल्या जीवनशैलीतील बदलांबद्दलच्या होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण व अध्ययन (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. मध्य प्रदेश येथील मालवांचल विद्यापीठ इंदोर मधून ही …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील सुतारांसाठी मोफत विमा योजना

  बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन (SSAF) यांच्या वतीने सुतारांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्व सुतार व त्यांच्या कामगारांना मोफत विमा पॉलिसी दिली जाणार आहे. तरी सर्व सुतार बांधवांनी आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती आहे. अधिक माहितीसाठी आधार कार्ड …

Read More »

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे समादेवी गल्ली श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. श्री समादेवीच्या कृपेने सोमवार रोजी शुभमुहूर्तावर जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ अविनाश बिडीकर यांच्या शुभहस्ते रोवण्यात आली. गुरुवार दि. २९ ते रविवार दि. १ होणाऱ्या …

Read More »

क्रेडाई बेल्कॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ

  बेळगाव : क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस यांच्यावतीने बेल्कॉन 2026 बांधकाम, प्राॅपर्टी, बांधकाम साहित्य इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान आज बुधवारी सकाळी सीपीएड मैदानावर सदर प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी प्रथमच सदर प्रदर्शन अत्यंत आधुनिक आणि …

Read More »

आर्थिक छळाला कंटाळून महिलेची डेथनोट लिहून आत्महत्या

  बेळगाव : मायक्रो फायनान्स संस्थांच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील आनिगोळ गावात घडली आहे. मृत महिलेचे नाव गौरव्वा नीलप्पा केंगानूर (वय 36) असे आहे. मृत गौरव्वा या महिलेने मायक्रो फायनान्सकडून ७-१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मायक्रो फायनान्स …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाची महत्त्वपूर्ण सुनावणी पुढे ढकलली

  बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाची महत्त्वपूर्ण सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांचे खंडपीठ उपलब्ध असणे बंधनकारक आहे परंतु बुधवारी न्यायालयात फक्त दोन न्यायाधीशांचेच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र सरकारने 2004 साली सीमावाद सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »