
बेळगाव : विद्या भारती कर्नाटक – बेळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य/विभागीय स्तरावरील फुटबॉल आणि हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
युवा खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक भावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे किरण जाधव यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देताना, भविष्यात बेळगावच्या युवा क्रीडा प्रतिभांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला ओंकार देसाई, राजेंद्र भातकांडे, सुजाता मॅडम, एस. व्ही. कुलकर्णी, आर. के. कुलकर्णी, पुनेकर तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta