Monday , August 31 2026
Breaking News

सेंट पॉल्स ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’; महिला गटात सेंट जोसेफ स्कूल विजेते

Spread the love

 

बेळगाव : 21व्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात उत्साहात संपन्न झाल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांना यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील विविध शाळांमधील 300 हून अधिक जलतरणपटूंनी स्पर्धेत सहभागी होत आपले कौशल्य दाखविले.

स्पर्धेच्या मुलांच्या गटात सेंट पॉल्स स्कूलने 79 गुण मिळवत सलग तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकाविला. महिला गटाचे विजेतेपद 47 गुणांसह सेंट जोसेफ स्कूलने मिळविले. मुलांच्या गटात 24 गुणांसह सेंट मेरीज स्कूल उपविजेते ठरले, तर मुलींच्या गटात 41 गुणांसह डिवाइन प्रोव्हिडन्स स्कूलने उपविजेतेपद मिळविले.

वैयक्तिक विजेते

कॉलेज गटात तनुज सिंग (जीएसएस), तर शालेय गटात युवराज पावशे (सेंट पॉल्स), अर्णव किल्लेकर (सेंट मेरीज), ऋषभ मधुकर (बेंगळूर), निधीश पी. (ज्योती सेंट्रल स्कूल), नमन पाटील (सेंट पॉल्स) आणि विराट उप्पार (मॉडेल स्कूल) यांनी वैयक्तिक विजेतेपद मिळविले.

मुलींच्या कॉलेज गटात सुनिधी हलकरे (जीआयटी) व समृद्धी हलकरे (आरटीपीयू) यांनी, तर शालेय गटात निधी कुलकर्णी (केएलएस पब्लिक स्कूल), निधी मुचंडी (सेंट मेरीज), पाकी हलगेकर (सेंट जोसेफ), सायली घुगरेटकर (सेंट जोसेफ), वर्धा उप्पार (मॉडेल स्कूल), आर्वी मुतकेकर (केएलएस) आणि दर्शिका निटुरकर (सेंट मेरीज) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विजेत्यांचा गौरव

बक्षीस वितरण समारंभात विमल फाउंडेशनचे किरण जाधव, नगरसेवक नितीन जाधव, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, विश्वास पवार, नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, शिवाजी हंगीरगेकर, शेखर हंडे, सुहास किल्लेकर आणि विजय भोंगाळे यांच्या हस्ते विजेत्या जलतरणपटूंना प्रशस्तीपत्र, पदके व चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक अमित जाधव यांच्यासह रणजीत पाटील, संदीप मोहिते, मारुती घाडी, वैभव खानोलकर, विजय नाईक, अमित कुडची, चंद्रकांत बेळगोजी, पुंडलिक कांबळे, राहुल काकतकर, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, स्नेहल धामणकर, कलाप्पा पाटील, विशाल वेसणे, किशोर पाटील, प्रसाद दरवंदर, विजय बोगन आणि प्रांजल सुळदाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बृहन्महाराष्ट्र मंडळ सदैव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी : दिलीप कुंभोजकर

Spread the love  अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर यांचा बेळगाव येथे जाहीर सत्कार बेळगाव : बृहन्महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *