बेळगाव : लॉकडाऊन आणि कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील निर्बंधांमुळे बिकट परिस्थिती ओढवली असतानाही पारंपारिक सर्कस कलेचा वारसा जोपासणार्या निपाणी येथील सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांसाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे नुकतीच सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. निपाणीतील सुपरस्टार सर्कसमधील कलाकारांच्या उपेक्षित जगण्याची व्यथा स्थानिक वृत्तपत्र माध्यमातून निदर्शनास येताच बेळगाव फेसबुक फ्रेंड्स …
Read More »उद्यापासून भाजपचे विशेष सेवा अभियान
बेळगाव : येत्या दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे विशेष सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान होणार आहे. यामध्ये …
Read More »आयएमएतर्फे उद्या भव्य कोरोना लसीकरण शिबिर
बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखा, जिल्हा प्रशासन, जिल्हा वैद्यकीय खाते तसेच तालुका वैद्यकीय खात्यातर्फे शहर परिसरातील विविध 18 खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दि. 17 रोजी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेचे सचिव व कॉलेज रोड येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक …
Read More »जीवनमुखी, फाउंडेशनच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना अन्न व शिष्यवृत्ती वाटप
बेळगांव : अनगोळमधील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात जीवनमुखी, सागर, निखिल व शीतल फौंउंडेशनच्या वतीने करोनाच्या काळात ज्या लोकांना संकटाला सामोरे जावे लागले, अशा लोकांना धान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, बीम्सचे रेडिओलॉजिस्ट डॉ. ईराण्णा आर पल्लेद, …
Read More »बेळगावात 17 सप्टेंबर रोजी तीन लाख जणांना लसीकरण
बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या एका दिवसात 25 ते 30 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. या विशेष राज्यव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 3 लाख डोस …
Read More »मंदिरांना हात लावाल तर खबरदार…
देवस्थान मंडळाच्यावतीने प्रशासनाला निवेदन बेळगाव : सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश देण्यात आला असला तरी आमचा त्याला तीव्र विरोध आहे, जर आमची मंदिर हटविण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सज्जड इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रणजीत चव्हाण-पाटील यांनी दिला आहे. …
Read More »श्रीगणेश-2021 किताबचा तानाजी चौगुले मानकरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘श्री गणेश -2021 किताब’ रॉ फिटनेस जिमच्या तानाजी चौगुले याने पटकाविला आहे. रामनाथ मंगल कार्यालय येथे काल मंगळवारी रात्री सदर शरीरसौष्ठव स्पर्धा …
Read More »करंबळच्या बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला मलप्रभा नदीत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला. त्या तरूणाचे नाव परशराम जयराम पाटील वय २७ असे आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्याचा दोन दिवस झाले तरी पत्ता नाही. म्हणून घरच्यानी शोधाशोध करून पाहिले. परंतु कुठेच …
Read More »पान दुकानदाराचा निर्घृण खून
बेळगाव : पान उधारी देण्यास नकार दिल्याने पान दुकानदाराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. वडगाव भागातील लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली आहे. बाळकृष्ण नागेश शेट्टी (५०) रा.लक्ष्मीनगर असे मृत पान दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय शिवानंद जंतिकट्टी रा.भारत नगर दुसरा क्रॉस याच्यावर शहापूर …
Read More »आत्मदहनाचा इशारा अन् आरसीयु पदव्युत्तर परीक्षा पुढे
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तरच्या अंतिम वर्षातील परीक्षा चार दिवस पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा मंगळवारपासून होणार होत्या. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात सोमवारी आंदोलन केल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या असून सदरच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.विद्यापीठाने गेल्या वीस दिवसांपुर्वी मागील सेमीस्टरच्या परीक्षा घेतल्या होत्या. महिनाभरातच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta