Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती

पुणे : सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 …

Read More »

आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात

आजरा : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय 54, रा. योगायोग नगर, …

Read More »

कोल्हापुरात उत्सुकता शिगेला, संजय पवार बाजी मारणार की महाडिकांना विजयी गुलाल लागणार?

कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी …

Read More »

आज राज्यसभा निवडणूक; मतबेगमीसाठी सगळ्यांची धावाधाव

मुंबई : आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख …

Read More »

कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

चंदगड : दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम चालू आहे. मात्र या कामाचा फटका येथील विष्णू पाटील नामक गरीब शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे. दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम सांगलीच्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. पावसाळ्याची अगोदर काम पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे. या घाईगडबडीत उखडून काढलेल्या रस्त्यावरील टाकाऊ कचरा, माती, दगड …

Read More »

देशमुख-मलिकांना मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सहावा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार असल्याने समीकरणं अवघड झाली आहेत. दरम्यान, या दिवशी मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणार्‍या …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील 1025 पैकी 569 गावांत विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी ठराव!

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय मे महिन्यात घेतल्यानंतर तोच पॅटर्न राबवण्यासाठी जिल्ह्यातील निम्म्या गावांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विधवा जगणं येणार्‍या अनेक महिलांच्या चेहर्‍यावर समाधानाची आणि सन्मानाची कळी खुलणार आहे. या निर्णयाने विधवा महिलांचे सौभाग्यलंकार कायम राहतील. शिवराज्यभिषेक दिनी जिल्ह्यातील गावांमध्ये विशेष …

Read More »

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी एकनाथ खडसे …

Read More »

उत्साळी येथे भक्तीमय वातावरणात ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळा सुरूवात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उत्साळी (ता. चंदगड) येथे दि. ६ जून पासून ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ८ जून रोजी कळस व …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात ईडीचा डाव सुरू होणार?

जिल्हा परिषद प्रारुप रचनेचा वाद पोहोचला थेट ईडीच्या दारी! कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारुप निश्चित झाल्यानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आता हा वाद थेट ईडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रभाग निश्चित करताना अनेक गावांची तोडफोड ’लक्ष्मी’ दर्शनाने झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा …

Read More »