Thursday , November 21 2024
Breaking News

कर्नाटक

मुख्यमंत्री सिध्दरामय्या उद्या दिल्ली भेटीवर

  काँग्रेस हायकमांडशी करणार चर्चा; नंदिनी दूध उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीला रवाना होत असून उद्या (ता. २१) ते काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहेत. कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ)च्या दिल्लीतील दूध दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धमय्या आज संध्याकाळी दिल्लीला रवाना …

Read More »

अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते केले गारमेंटचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरामधील साळुंखे गारमेंटच्या व्यवस्थापिका वर्षा साळुंखे यांनी महिलांना उद्योग व्यवसाय मिळवून देण्यासाठी साळुंके गारमेंटची निर्मिती केली होती. त्यानंतर आता जत्राट येथे दुसऱ्या विभागाचे उद्घाटन अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रियांका जारकीहोळी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या …

Read More »

बोरगाव उरुसाला भाविकांची गर्दी; आज विविध शर्यतींचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या उरुसाचा मंगळवारी (ता.१९) मुख्य दिवस होता. त्यानिमित्त गलेफ घालण्यासह नैवेद्य व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या …

Read More »

खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी

  खानापूर : खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी वाढली असून या व्यवसायासाठी विजेचीही बेकायदेशी वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याकडे हेस्कॉमसह प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी डोळेझाक करत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. खानापूर नदी पात्रातील, वनक्षेत्रातील, सर्व्हे क्रमांक जमिनीतील वाळूची तस्करी जोरात सुरु असून बेकायदेशीरपणे वीज देखील वापरली …

Read More »

9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन

बेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. अधिवेशन बोलावण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे पाठवण्यात आल्याची पुष्टी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने केली आहे. एक ऐतिहासिक टप्पा म्हणून यंदा सरकार गत 26 व 27 …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुयश

  खानापूर : मराठा मंडळ संस्था संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर, हे बेळगाव जिल्ह्यातील एक नामांकित पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी अभ्यास, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात अनेक लोकोपयोगी उपक्रम …

Read More »

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. नामनियुक्त नगरसेवकांची नावे 1. अभिषेक होसमनी, 2. इसाक खान पठान, 3. रूपाली रवी नाईक सदर नियुक्ती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव …

Read More »

घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू

  हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हुक्केरी तालुक्याच्या बेनकनहोळी गावानजीक घटप्रभा नदीत रविवारी सायंकाळी घडली आहे. लक्ष्मण राम अंबली (वय 49), रमेश लक्ष्मण अंबली (वय 14) आणि यल्लाप्पा लक्ष्मण अंबली (वय 12) अशी मृतांची नावे …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन

  राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला दुष्काळ, उन्हाळ्यातील दुष्काळ, अतिवृष्टी महापूर काळात शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह, ऊस, तंबाखू, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याशिवाय दरवर्षी हंगाम काळात विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे शेकडो एकरातील ऊस जळत आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रयत संघटना शासनाला …

Read More »

पात्र लाभार्थ्यांची बीपीएल कार्डे रद्द नाहीत

  सिध्दरामय्या; भाजपचा आरोप खोटा बंगळूर : राज्य सरकार बीपीएल कार्ड रद्द करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला असून केवळ अपात्र बीपीएल कार्डे रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात हमीयोजनासाठी निधी नसल्यामुळे बीपीएल कार्ड कापले जात असल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, आम्ही अपात्र …

Read More »