निपाणी (वार्ता) : निपाणीपासून जवळच असलेल्या बेनाडी येथील समुदाय भावना पासून येणारे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …
Read More »बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची सूचना : पाच वर्षे पूर्ण झाल्यास ई-केवायसी पुन्हा बंधनकारक
शुल्क मागितल्यास तक्रार करा बेळगाव : अपात्र बीपीएल शिधापत्रिकांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, प्रत्येक पाच वर्षांनी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीला सप्टेंबर २०२६ पर्यंत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी तातडीने पुन्हा ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन …
Read More »निपाणी येथे भीषण अपघातात एक जण ठार; मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी
निपाणी ( वार्ता) : निपाणी – मुरगूड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडी मुंबईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी प्रभाकर शिंदे (वय ३३) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी निता शिवाजी …
Read More »बोरगाव विद्यासागर शैक्षणिक संस्थेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विद्यासागर शैक्षणिक संस्था, श्री विद्यासागर कन्नड आणि इंग्रजी माध्यम प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, श्री विद्यासागर एज्युकेशन कॉलेज (बी.एड.), श्री विद्यासागर आयटीआय कॉलेज आणि संजय फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष …
Read More »निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे आषाढी एकादशी साजरी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहर रिक्षा असोसिएशनतर्फे रिक्षा स्टँडवर प्रथमच श्री विठ्ठल-मुर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. वारकरी परंपरेचे जतन करणारे रिक्षा असोसिएशनमधील वारकरी रिक्षाचालक सुरेश खाडे, प्रविण पोवार आणि अशोक मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थीत रिक्षा …
Read More »श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची नगरपालिकेत गांभीर्याने पुण्यतिथी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका नगरपालिकेतर्फे निपाणी संस्थांचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे -निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. प्रारंभी निपाणी नगरपालिकेतील अभियंते विवेक जोशी यांनी निपाणकर राजघराण्याचे विद्यमान राजसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर, विजयराजे निपाणकर यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. विवेक जोशी यांच्या शुभहस्ते श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला वेग, बुधवारी शपथविधीची दाट शक्यता
बेंगळुरू : नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे काही दिवस रखडलेला कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना होणार असून, बुधवारी मंत्रिमंडळ विस्तारासह नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या सोमवारी …
Read More »आमदारांचे नाव सांगून धमक्या, पैशांची मागणी; वैतागलेल्या पंचायत कर्मचाऱ्याची पोलिसांत तक्रार
खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत तांत्रिक समन्वयक म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ हट्टीहोळी यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हळगेकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सुनील मड्डीमनी आणि श्रीकांत इटगी हे अनेक दिवसांपासून त्यांच्या शासकीय …
Read More »कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, मात्र जनतेच्या सेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. रविवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सिद्धरामय्या यांनी …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मुलांच्या पालखी दिंडी सोहळ्यासह माऊली अश्वाचार रिंगण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन झाले. त्यानंतर टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पालखी दिंडीला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta