Friday , August 21 2026
Breaking News

श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेची 800 कोटी ठेवीकडे वाटचाल

Spread the love

 

संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची माहिती : संस्थेच्या कार्याचा घेतला आढावा

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने 700 कोटी ठेवीचा टप्पा पार करून 800 कोटी ठेवीकडे, वाटचाल केली आहे. समाजाचे आर्थिक हित झोपायचे काम सुरू असल्याचे मत सहकाररत्न संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. संस्थेमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
डॉ. कुरबेट्टी यांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना 1991 मध्ये झाली. या संस्थेने हजारो कुटुंबांना आर्थिक मदतीचा आधार देऊन त्यांच्याजीवनात अमुलाग्र बदल घडवण्याचे काम केले आहे. यामुळेच संस्थेकडे ठेवींचा दिवसेदिवस ओघ वाढत आहे. ठेवीदार, आणि सभासद, यांचा विश्वास संस्थेने संपादन केल्याने महात्मा बसवेश्वर संस्थेची प्रगतीची घोडदौड सुरू वेगाने सुरू आहे. विना सहकार नाही उद्धार, या संकल्पनेनुसार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 1980 ते 90 च्या दशकामध्ये सहकारी चळवळीतून निपाणी व निपाणी, परिसरामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपली जावी, समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजामध्ये एकी नांदावी त्या हेतूने उद्दिष्ट घेऊन अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. पण काळाच्या ओघांमध्ये काही संस्थांना तो हेतू व उद्दिष्ट जपता आले नाही. त्यामुळे अनेक संस्था काळाच्या ओघात लोप पावल्या.
संस्थेने नेहमीच सामाजिक, हित जोपासले आहे. सामाजिक आर्थिक, नैसर्गिक, संकटे निर्माण झाली त्या त्यावेळी संस्थेने आपल्या परीने मोलाची मदत सभासद, कर्जदार, ठेवीदार, ग्राहकांना वेळोवेळी केली आहे.
संस्थेच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या काळामध्ये रुपये 7 लाखाच्या ठेवी होत्या. सध्या 700 कोटी ठेवीचा टप्पा ओलांडून 800 कोटीकडे वाटचाल करीत आहे. संस्थेच्या 35 शाखा असून संस्थेकडे 60000, सभासद संख्या असून शेअर भाग भांडवल 1 एक कोटी, 57 लाख 82 हजार, स्वनिधी 86 कोटी, 65 लाख, सुरक्षित गुंतवणूक 318 कोटी 34 लाख, कर्ज वितरण केले असून 480 कोटी खेळते भांडवल, 825, कोटी 69 लाख उलाढाल झाली आहे. संस्थेला 10 कोटी 69 ,लाख झाल्याचे त्यांनी सांगितले सांगितले. संस्था सहकाराचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेचे निस्वार्थी व पारदर्शक संचालक मंडळ, व कुशल तज्ञ कष्टाळू कर्मचारी वर्ग, विश्वासू सभासद, कर्जदार, ठेविदारामुळे संस्थेची प्रगती होत असल्याचे डॉ. कुरबेट्टी यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली, संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमने, प्रताप पट्टनशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील. राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. आदन्नावर व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गळतगा स्मशानभूमी हिरवीगार करण्यासह बुद्धविहारात शांततेसोबत पक्ष्यांचा अधिवास

Spread the love  निपाणी (वार्ता) : भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गळतगा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ देशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *