Friday , August 21 2026
Breaking News

अंमलझरी येथे धर्मस्थळ संस्थेतर्फे वृक्षारोपण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : धर्मस्थळ कृषी अभिरुद्धी संघाकडून अंमलझरी येथे विविध प्रकारची रोपे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी धर्मस्थळ कृषी अभिवृद्धी संघाचे कृषी अधिकारी व पदाधिकारी, आणि श्री रेणुका देवस्थान कमिटीतील संचालक व गावातील धर्मस्थळ संघातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
रेणुका मंदिरच्या परिसरात तब्ब्ल २० आंबा, पेरू, लिंबू, सिताफळ, शेवगा या प्रकारची रोपे लावण्यात आली. प्रारंभी प्रतिमा पूजन करुन मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कृष्णात बाडकर यांनी केले. यानंतर रवी कदम सचिन कौंदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र मोहिते यांनी, धर्मस्थळ संस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमास वसंत रेपे, रामा खोत, मलगोंडा कंकनवाडे, परशराम सुतार, सुधाकर पाटील, शंकर दावणे, अन्नापा खोत, रवींद्र मोहिते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

नवीन बंधारा निर्मितीसह जुन्या बांधाराच्या दुरुस्तीसाठी बोरगावमध्ये शेतकऱ्यांची बैठक

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती करण्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *