Sunday , September 20 2026
Breaking News

रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांचा पहाटे छापा; ८.५ लाखांची रोकड, १० वाहने जप्त

Spread the love

 

बेळगाव : उत्तर विभागातील पोलिसांनी बुधवारी पहाटे बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय रौडीशीटरांच्या घरांवर एकाचवेळी धडक कारवाई करत मोठा छापा टाकला. या मोहिमेत एकूण ४५६ सक्रिय रौडीशीटरांच्या घरांची झडती घेण्यात आली.

छापेमारीदरम्यान पोलिसांनी ८ लाख ५० हजार रुपयांची रोकड, नोंदणी क्रमांक आणि कागदपत्रे नसलेली १० वाहने तसेच दोन धारदार मच्छू (कोयते) जप्त केले. याशिवाय न्यायालयाने अटक वॉरंट (NBW) जारी केलेले आणि फरार असलेले दोन रौडीशीटर शोधून त्यांना अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर संबंधित जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध शस्त्रे, संशयास्पद रोकड, कागदपत्रांविना वाहने जप्त करून फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल उत्तर विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

या विशेष मोहिमेबद्दल उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांनी सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *