बंगळूर : बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्ड मिळण्यासाठी सध्या लागू असलेली वार्षिक उत्पन्नाची १.२० लाख रुपयांची मर्यादा प्रशासनिक सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार व कायदेशीर मापनशास्त्र विभाग …
Read More »दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन
निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बोरगाव सर्कलमध्ये दलित, समाजातील कार्यकर्ते, युवक आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद झाला होता. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. …
Read More »महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी
बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल विक्री केंद्रे, ढाबे, हॉटेल, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांकडून नियमानुसार शुल्क व कर आकारण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहेत. यासंदर्भात विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी सूचना देताना …
Read More »खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावाला बससेवेची भेट; सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
खानापूर : खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर व्हाया हिरेहट्टीहोळी गावातून सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेचे उद्घाटन खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या बससेवेमुळे हिरेहट्टीहोळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या वेळी बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे गॅरंटी योजनेचे …
Read More »निपाणीत उद्या एकदिवशीय लाक्षणीक उपोषण
निपाणी (वार्ता) : गेल्या २५ दिवसापासून जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह विद्यार्थ्यावरील झालेला लाठी चार्ज व मारहाणी प्रकरणी जाहीर निषेध नोंदवण्यासाठी निपाणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थीतर्फे शनिवारी (ता.२५) सकाळी १० वाजता एकदिवशीय …
Read More »प्रश्नपत्रिका फुटीला लगाम; ७० हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’
भरती परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाच्या सक्त सूचना बेंगळूरू : राज्यातील भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. विविध विभागांतील सुमारे ७० हजार पदांच्या भरतीसाठी व्यापक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित …
Read More »मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि सीआरपीना केल्या होत्या. पण त्याकडे …
Read More »म. ए. युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील हलशी, हलशिवाडी, गुंडपी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे : चंद्रकांत देसाई खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील …
Read More »निपाणी शहर अंजुमन कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात निपाणी शहर अंजुमन कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सहकारत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष पदी इलियास पटवेगार, उपाध्यक्षपदी बक्तीयार कोल्हापुरे, सेक्रेटरी पदी फारूक गवंडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून …
Read More »मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील; आमदार शशिकला जोल्ले
अमृत नगरोत्थान योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वितरण निपाणी (वार्ता) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळेच सर्वसामान्य वर्गाला अधिकार, हक्क मिळाले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. ततालुक्याचा विकास करीत असताना जात, पंथ, पक्ष पाहिले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta