Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

म. ए. युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

  खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी युवा समितीच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक २५ जुलै रोजी इदलहोंड आणि गणेबैल मराठी …

Read More »

निपाणी येथील मराठा मंडळातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

  निपाणी (वार्ता) : निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य व भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेल्या …

Read More »

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

  निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे आपल्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव विसरून विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती भावाने एकरूप होतात. तिथे सारे भेदभाव गळून पडतात. संत ज्ञानेश्वर सावता माळी सोपान देव चोखामेळा तुकाराम अशा संतांच्या साहित्यातून समाजाला नव संजीवनी प्राप्त होते, असे मत डॉ. श्रीपती रायमाने यांनी …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.त्या निमित्त दिंडी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. के.जी. ते इयत्ता दुसरी अभंग आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तिसरी ते पाचवी उपवास पदार्थ स्पर्धा, सहावी ते आठवी संतांविषयी कथा कथन स्पर्धा, इयत्ता …

Read More »

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल विजय दिन आणि निपाणीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय सुगते यांच्या सुविद्य पत्नी व गायिका आरती संजय सुगते यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले व संचालिका अपूर्वा चौगुले यांच्या संकल्पनेतून येथील नेसरीकर प्लॉटमध्ये वृक्षारोपण …

Read More »

अन्नभाग्य तांदळाच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नवा कायदा

नीट प्रकरणावरून मोदी सरकारवर प्रियांक खर्गे यांची टीका बंगळूर : अन्नभाग्य योजनेतील तांदळाची काळाबाजारात होणारी विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांच्याकडे नवीन कायदा करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बंगळुर येथे …

Read More »

राज्यात दुष्काळाची चाहूल; पिण्याच्या पाण्यासाठी आगाऊ उपाययोजना

  डी. के. शिवकुमार; पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार बंगळूर, ता. २५: आलमट्टी धरण परिसर वगळता राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची छाया निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सरकारकडून तातडीने आगाऊ उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी …

Read More »

शट्टीहळ्ळीत आषाढी एकादशीनिमित्त प्राथमिक मराठी शाळेत भक्तिमय पालखी सोहळा

  विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी जिंकली मने शट्टीहळ्ळी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शट्टीहळ्ळी येथील प्राथमिक मराठी मुलांची शाळा आणि अंगणवाडीच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संत संस्कृती आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. यावेळी विद्यार्थ्यांनी …

Read More »

सलामवाडीत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला पालखी सोहळा

  घटप्रभा हायस्कूल, प्राथमिक शाळा व अंगणवाडीचा भक्तिमय उपक्रम दड्डी : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने घटप्रभा हायस्कूल, प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी …

Read More »

निपाणी मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

    निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात विकास कामे रखडली आहेत. त्यांना चालना देण्याच्या मागणीचा निवेदन केपीसीसी सदस्य व महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी भेट बंगळुर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जरकीहोळी भेट घेऊन दिली. यावेळी निपाणी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसह सध्या सुरू …

Read More »